Tarun Bharat

साताऱ्याला मी अवश्य भेट देईन; राष्ट्रपती मुर्मूंचे आश्वासन

प्रतिनिधी/सातारा

छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन महिलांच्या शिक्षणाला प्राधान्य देऊन महिलांचा सन्मान करणारे छत्रपती प्रतापसिंह महाराज यांच्या ऐतिहासिक सातारा नगरीला मी अवश्य भेट देईन, असे आश्वासन महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी दिले. भारताच्या नवनिर्वाचित राष्ट्रपतीपदी द्रौपदी मुर्मूजी यांची निवड झाली. त्यानिमित्त नवनिर्वाचित राष्ट्रपतींची भेट घेऊन अभिनंदन केले. तसेच त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

भारताच्या राष्ट्रपतीपदी प्रथमच आदिवासी महिला म्हणून द्रौपदी मुर्मूजी यांची निवड झाली. भाजप प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या उमेदवार महामहिम द्रौपदी मुर्मूजी यांची प्रचंड मताधिक्यांनी निवड झाली. या सर्वोच्च पदावर विराजमान होणाऱ्या त्या पहिल्या आदिवासी महिला आणि भारताच्या दुसऱ्या महिला आहेत. मुर्मू यांची या पदावर निवड करून भारताने नवीन इतिहास रचला.

या भेटीत त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे एक प्रतिक राजमुद्रा आणि पुष्पगुच्छ भेट देऊन खासदार छ. उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रपतींचा सन्मान केला. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूयांना साताऱ्याचा ऐतिहासिक तसेच सामाजिक वारसा सांगितला. छत्रपती शाहू महाराजांनी वसवलेल्या सातारा नगरीत छत्रपती प्रतापसिंह महाराज यांनी सामाजिक परिवर्तनासाठी आपले सर्वस्व पणाला लावले होते. त्यांनी आपल्या रयतेला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षणाची दारे खुली केली. विशेषतः महिलांच्या शिक्षणाची सोय साताऱयात निर्माण केली. अशा या ऐतिहासिक सातारा नगरीला आपण आवश्य भेट द्यावी अशी विनंती करून राष्ट्रपतीनां निमत्रित केले.

हे ही वाचा : द्रौपदी मुर्मू भारताच्या नव्या राष्ट्रपती

ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सहकार्य देऊ
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूजी यांनी काही काळ शिक्षिका म्हणून नोकरी केली. त्यामुळे त्यांना शिक्षणाचे महत्व चांगलेच माहीत आहे. विशेषतः मुलींच्या शिक्षणाचे महत्व त्यांना माहीत आहे. त्यामुळे ज्या सातारच्या छत्रपती घराण्याने महिलांच्या शिक्षणाचा वारसा निर्माण केला अशा मराठा साम्राजाच्या राजधानीस मी आवश्य भेट देईन. तसेच सातारा नगरीचा ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी सहकार्य देऊ असे आश्वासन त्यांनी दिले.

Related Stories

वाढदिवसानिमित्त राज ठाकरेंचे कार्यकर्त्यांना भावनिक पत्र; ते म्हणाले…

Tousif Mujawar

आईचा खून करुन मुलगा पोलीस ठाण्यात

datta jadhav

मास्क न घातल्याने बल्गेरियाच्या पंतप्रधानांना 174 डॉलरचा दंड

datta jadhav

जळगाव दूध संघाच्या अध्यक्षपदी आ. मंगेश चव्हाण बिनविरोध

datta jadhav

सिव्हील हॉस्पिटलमध्ये थॅलेसेमिया रुग्णांचे हाल

datta jadhav

Ratnagiri : महामार्गावर गोवंशाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!