रांची : झारखंडच्या आयएएस अधिकारी पूजा सिंघल यांना राज्य सरकारने गुरुवारी सेवेतून निलंबित केले. अंमलबजावणी संचालनालयाने बुधवारी त्यांना अटक केली होती. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. सिंघल यांच्याबरोबरच त्यांच्या पतीलाही अवैधपणे कोटय़वधींची माया गोळा केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ईडीच्या अधिकाऱयांनी मनरेगा घोटाळा, पल्स हॉस्पिटलमधील गुंतवणूक, सीए सुमन कुमार यांच्या ठिकाणाहून जप्त केलेली कोटय़वधी रुपयांची रोकड आणि बनावट कंपन्यांशी संबंधित आरोपांवरून दोघांवरही कारवाई केली आहे. गेल्या आठवडय़ापासून ईडीकडून छापासत्र आणि दस्तावेज तपासण्याचे काम सुरू होते.


previous post