Tarun Bharat

इंग्लंडच्या हॅरी बुकला आयसीसी पुरस्कार

वृत्तसंस्था/ दुबई

आयसीसीतर्फे प्रत्येक महिन्यात सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटूंची निवड त्यांच्या विविध स्पर्धातील कामगिरीचा आढावा घेत केली जाते. मात्र, फेब्रुवारी महिन्यासाठी इंग्लंडचा हॅरी बुक तसेच ऑस्ट्रेलियाची ऍश्ले गार्डनर यांची अनुक्रमे सर्वोत्तम पुरुष आणि महिला क्रिकेटपटू म्हणून घोषणा केली आहे.

आयसीसीच्या या प्रतिष्ठच्या पुरस्काराकरिता यावेळी इंग्लंडचा हॅरी ब्रुक, भारताचा अष्टपैलू रविंद्र जडेजा आणि विंडीजचा जी. मॉटी यांच्यात जबरदस्त चुरस निर्माण झाली होती. पण अखेर ब्रुकने आपल्या या प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकत हा पुरस्कार हस्तगत केला. इंग्लंडच्या हॅरी ब्रुकने आयसीसीचा हा पुरस्कार दुसऱयांदा पटकाविला आहे. न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत ब्रुकने दमदार कामगिरी केली होती. पाकचा कर्णधार बाबर आझमने यापूर्वी आयसीसीचा हा पुरस्कार दोनवेळा पटकाविला आहे.

7 फेब्रुवारी महिन्यातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा पुरस्कार ऑस्ट्रेलियाच्या अनुभवी ऍश्ले गार्डनरने पटकाविला आहे. नुकताच झालेल्या आयसीसीच्या महिलांच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आपल्या संघाला जेतेपद मिळवून देण्यामध्ये गार्डनरची कामगिरी महत्त्वाची ठरली होती. ऍश्ले गार्डनरने आयसीसीचा हा पुरस्कार आतापर्यंत दोनवेळा मिळविला आहे. गेल्या डिसेंबरमध्ये तिने पहिल्यांदा हा पुरस्कार घेतला होता.

Related Stories

भारत-पाकिस्तान लढतीत उभय कर्णधारांचा कस लागेल!

Amit Kulkarni

ऑलिंपिक मिशनसाठी ऍथलीटस्ना निधी मंजूर

Patil_p

लक्ष्य सेन मानांकनात सहावा

Patil_p

स्विटोलिना, सेरेना, केनिन, व्हेरेव्ह तिसऱया फेरीत

Amit Kulkarni

वेल्सचा 64 वर्षांनंतर विश्वचषक स्पर्धेत प्रवेश

Patil_p

फुटबॉलपटू विजयनची ‘पद्मश्री’साठी शिफारस

Patil_p
error: Content is protected !!