सिंधू नदीच्या काठावर आहे अनोखे ठिकाण
लडाख हे सिंधू नदीच्या काठावर वसलेले अत्यंत सुंदर आणि प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. लडाखमधील हिमाच्छादित शिखरे तसेच तेथील मनमोहक दऱयाखोऱया मनाला आनंद मिळवून देतात. लडाखमधील लेह येथे भारतातील पहिला नैसर्गिक आइस कॅफे सुरू झाला आहे.
हा कॅफे समुद्रसपाटीपासून 14 हजार फुटांच्या उंचीवर आहे. हा कॅफे मनाली-लेह महामार्गावर आहे. या आइस कॅफेची निर्मिमी बीआरओने नैसर्गिक प्रक्रियेच्या माध्यमातून केली आहे. हा कॅफे एखाद्या ढिगाच्या आकारात तयार करण्यात आला असून याचा उद्देश हिवाळय़ात पाण्याची बचत करणे आणि नंतर सिंचनासाठी याचा वापर करणे आहे.
खाण्यापिण्याच्या सुविधा
देशातील पहिल्या नैसर्गिक आइस कॅफेमध्ये मसाला चहा, जिंजर टी, बटर-टी आणि मसाला मॅगी मिळते. बीआरओने चार स्थानिक तरुणांसोबत मिळून याची निर्मिती केली आहे. या कॅफेच्या निर्मितीची कल्पना मॅकेनिकल इंजिनियर सोनम वांगचुक यांच्या प्रकल्पातून घेण्यात आली आहे.
आइस कॅफेची एक झलक व्हायरल व्हिडिओत दिसून येते. या व्हिडिओला ट्रव्हलरियलइंडिया नावाच्या अकौंटद्वारे इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यात आले आहे. ‘भारतातील पहिला आइस कॅफे लडाखमध्ये आहे’ असे याच्या कॅप्शनमध्ये नमूद आहे. या व्हिडिओला तीन महिन्यांपूर्वी पोस्ट करण्यात आले होते आणि आतापर्यंत लाखो लोकांनी तो पाहिला आहे. 92 हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाइक केले आहे.