ऑनलाईन टीम / मुंबई :
इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन्सचे (ICSE ) इयत्ता दहावी आणि ISC बारावीचे निकाल जाहीर झाले आहेत. दहावीचा निकाल 99.98 तर बारावीचा निकाल 99.76 लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना अंतर्गत मुल्यमापन आणि आगोदरच्या वर्षातील गुणांचा विचार करुन गुणदान करण्यात आले आहे.
ICSE बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेसाठी देशभरातून तसेच परदेशातून 2,19,499 तर ISC बारावीच्या परीक्षेसाठी 94,011 विद्यार्थी बसले होते. त्यामधील दहावीत 99.98 टक्के तर बारावीत 99.76 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. महाराष्ट्रातील ICSE दहावी बोर्डाचा निकाल 100 टक्के तर बारावीचा निकाल 99.94 टक्के लागला आहे.