प्रतिनिधी /बेळगाव
जीएसएस कॉलेजमध्ये नुकताच इन्स्टिटय़ूशन्स इनोव्हेशन कौन्सिलतर्फे विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला वाव मिळावा, यासाठी आयडिया प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित करण्यात आली. या स्पर्धेत कॉलेजच्या 11 संघांनी भाग घेतला असून आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होऊ शकतो, या विषयावर विद्यार्थ्यांनी प्रेझेंटेशन केले.
अध्यक्ष म्हणून कॉलेजचे प्राचार्य बी. एल. मजुकर, परीक्षक म्हणून एसकेई सोसायटीचे व्यवस्थापक पिअर कारवालो व आरपीडी कॉलेजच्या प्रा. सरस्वती धरणगुत्ती उपस्थित होत्या. आयआयसीच्या अध्यक्षा लता लक्ष्मेश्वर यांनी सर्वांचे स्वागत केले. या स्पर्धेत रिऍलिटी प्रिझम संघाने प्रथम, पिपर धोस्ट संघाने द्वितीय, मस्कीटरस संघाने तृतीय क्रमांक पटकावला. क्य्रू या संघाला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाले. कॉलेजचे प्राचार्य बी. एल. मजुकर यांनी विजयी संघांचे कौतुक करून मानचिन्ह देऊन गौरव केला. विद्यार्थ्यांना डॉ. लता लक्ष्मेश्वर, समन्वयक शर्वरी देसाई व श्वेता दळवी यांचे मार्गदर्शन लाभले.