Tarun Bharat

खांडोळा श्री दाड देवाची 6, 7 रोजी मूर्ती प्रतिष्ठापना

वार्ताहर /माशेल

खांडोळा माशेल येथील श्री भगवती हळदोणकरीण देवस्थानच्या श्री दाड देवाचा नूतन मूर्ती प्रतिष्ठापना, शिखरकलश स्थापना व श्री आकारी पुरुष देवता, स्थिर प्रतिष्ठापना सोहळा दि. 6 व 7 रोजी आयोजित करण्यात आला आहे. कामत हळदणकर कुटुंबियांतर्फे हा सोहळा होणार असून यानिमित्त दोन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार दि. 6 रोजी सकाळी 7 वा. पासून विविध धार्मिक विधी तसेच श्री दाड देवाच्या नूतन मूर्ती व शिखर कलशाचे भव्य मिरवणुकीसह देवस्थानच्या प्राकारात आगमन होईल. सकाळी 9 वा. नांदी, श्राद्ध, स्थलप्राकारशुद्धी, गंगापूजन, जलाधिवास, सुवासिनींतर्फे मूर्तीस गंगास्नान घालण्यात येईल. त्यानंतर शांती होम, अग्निस्थापना, नवग्रह मंडळ, स्थापनापूजन, वास्तूहोम, लघुपूणाहुती आदी विविध धार्मिक विधी होतील. दुपारी 1 वा. महाप्रसाद, सायं. 7 वा. रक्षोघ्नहोम होईल.

रविवार दि. 7 रोजी सकाळी धार्मिक विधी व 9.16 वा. च्यारी व कामत हळदणकर कुटुंबीय, कुळावी, मुळावी तसेच वे. मू. संदीप टेंगसे, ब्रह्मवृंद व यजमानांच्या उपस्थितीत नूतन शिखर कलश स्थापना होईल. 9.45 वा. दाड देवाची मूर्तीप्रतिष्ठापना, च्यारी व कामत हळदणकर कुटुंबीय यांच्याहस्ते तसेच श्री आकारी देवता स्थिर प्रतिष्ठापना होणार आहे. त्यानंतर महापूजा, बलिदान, महापूर्णाहुती, आरती, गाऱहाणे, तीर्थप्रसाद व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.

Related Stories

सोनालीचा मृत्यू हा पूर्वनियोजित खूनच!

Amit Kulkarni

बेकायदा मासेविक्रीवर आजपासून मडगाव नगरपालिकेची कारवाई

Patil_p

मुरगाव विकास व नियोजन प्राधिकरणाने चिखली ग्रामस्थांचा आराखडा फेटाळला

Patil_p

पाळोळे भागात गढूळ पाण्याचा पुरवठा

Amit Kulkarni

जमीन घोटाळाप्रकरणी बेतीच्या नूर फैजल सुलेमान भाटकरला अटक

Amit Kulkarni

गोवा माईल्स, ऍप टॅक्सी परवानगी त्वरीत रद्द करा

Patil_p