Maharashtra- Karnatak Disput : महाराष्ट्र- कर्नाटक सीमावद उफाऴून यावा यासाठी कर्नाटकातून कोणीतरी जाणुन प्रयत्न करत आहे. असेच प्रयत्न महाराष्ट्रातून होत आहेत का हे सरकारने पहावं. असे सांगून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Takrey) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी अशी वादग्रस्त विधाने करून संघर्षाला खतपाणी घालू नये. तसेच हे प्रकार तत्काळ थांबवा असा इशारा त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर दिला आहे.
आपल्या सोशल मीडीयावर जारी केलेल्या पत्रकात बोलताना ते म्हणाले “कोणताही प्रश्न सामोपचाराने मिटवायला हवा. जर कर्नाटकचे मुख्यमंत्री जर चिथावणीखोर विधाने करत असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही गप्प बसणार नाही. 2023च्या कर्नाटक विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हे प्रकार घडत असून मराठी माणसांनी हे ध्यानात ठेवावे. कर्नाटकची भाषा जर निव्वळ आव्हानाची असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि मराठी बांधव गप्प बसणार नाहीत.” असा इशारा राज ठआकरे य़आंनी दिला आहे.

