Tarun Bharat

इफ्फी म्हणजे चित्रपट निर्मात्यांसाठी त्यांचे चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी

ज्येष्ट अभिनेत्री आशा पारेख यांचे मत

प्रतिनिधी /पणजी

वर्षानुवर्षे इफ्फी हा महोत्सव अधिक मोठय़ा प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. हा महोत्सव चित्रपट निर्मात्यांना त्यांचे चित्रपट सादर करण्याची तसेच त्यांची विक्री करण्याची संधी उपलब्ध करून देतो. इफ्फीच्या निमित्ताने संपूर्ण देशातील लोक एकत्र येत असल्याने हा महोत्सव म्हणजे सिनेप्रेमींसाठी भेट देण्याचे सर्वोत्तम ठिकाण ठरले आहे असे मत गोवा येथे सुरु असलेल्या 53 व्या इफ्फीमध्ये म्हणजेच भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जेव्हा दादासाहेब फाळके पारितोषिकासाठी रेट्रो विभागात ‘कटी पतंग’ या सदाबहार चित्रपटाचे सादरीकरणावेळी बोलताना व्यक्त केले.  यावषीच्या इफ्फीमधील हा रेट्रो विभाग, ज्येष्ट अभिनेत्री आणि दादासाहेब फाळके पुरस्कार विजेत्या आशा पारेख यांच्याप्रती समर्पित आहे.

अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये झळकत असल्याने आशा पारेख यांना रसिकांकडून 60 आणि 70च्या दशकातील ‘हिट गर्ल’चा किताब मिळाला होता. बालकलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत कारकीर्द सुरु केल्यानंतर, आशा पारेख यांनी 1959 सालच्या ‘दिल देके देखो’ या चित्रपटातून मुख्य अभिनेत्रीच्या रूपाने पदार्पण केले. हा चित्रपट सुपरहिट झाल्यामुळे आशा पारेख यांना मोठी प्रतिष्ठा आणि प्रसिद्धी लाभली. त्यानंतर त्यांनी 95 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. य काळात त्यांनी सर्वोत्तम चित्रपट निर्माते आणि आघाडीच्या सर्व नायाकांसोबत काम केले. यात शक्ती सामंता, राज खोसला, नासीर हुसेन, राजेश खन्ना, धर्मेंद्र, शम्मी कपूर, मनोज कुमार देव आनंद आणि इतर अनेक बडय़ाबडय़ा व्यक्तिमत्त्वांसोबत काम केले. आशा पारेख यांना 1971 साली कटी पतंग या चित्रपटासाठी फिल्मफेअरच्या सर्वोत्तम अभिनेत्री या पुरस्काराने गौरविण्यात आले तर वर्ष 2002 मध्ये त्यांना फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्कारांशिवाय इतर अनेक मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. आशा पारेख या दिग्दर्शक, निर्माता देखील आहेत तसेच त्या ख्यातनाम भारतीय शास्त्रीय नर्तिका देखील आहेत.

Related Stories

वाळपई पोलिसांची मेळावलीत दडपशाही

Patil_p

महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सर्वच अडचणीत

Omkar B

मगोचे दहा उमेदवार जाहीर

Amit Kulkarni

सांकवाळचे सरपंच रमाकांत बोरकर यांच्याविरूध्द अविश्वास ठराव दाखल

Amit Kulkarni

सरकारला सल्ला देण्यापेक्षा जनतेसाठी काम करा फोंडा भाजपा मंडळाचा सुदिन ढवळीकरांना सल्ला

Omkar B

काजू फेणीवरील स्पेशल कव्हरचे प्रकाशन

Omkar B