Tarun Bharat

ऐतिहासिक सडा किल्ला दुर्लक्षित

छत्रपती शंभूराजे परिवार अन् ऑपरेशन मदततर्फे राबविणार स्वच्छता अभियान : 24-25 डिसेंबर रोजी दुर्गसंवर्धन मोहीम

वार्ताहर /कणकुंबी

छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे पुत्र राजाराम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा या तीन राज्यांच्या सीमेवर वसलेल्या सडा येथील ऐतिहासिक किल्ल्याच्या संवर्धनासाठी ‘छत्रपती शंभूराजे परिवार महाराष्ट्र राज्य’ यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शंभुराजे परिवार बेळगाव विभागातर्फे येत्या 24 आणि 25 डिसेंबर रोजी दुर्ग संवर्धन मोहीम हाती घेण्यात येणार आहे. या दरम्यान सडा किल्ल्याच्या परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सडा किल्ल्याबद्दल आपण थोडक्मयात जाणून घेऊया.

या गावाला ऐतिहासिक वारसा असून हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज तसेच राजाराम महाराज यांचे वास्तव्य होते, अशा नोंदी पाहायला मिळतात. सडा किल्ल्यामधील टेहळणी बुऊज, भुयार, तोफा, पडझड झालेला राजवाडा, तलवारी व परिसरातील सुमारे 60 विहिरी आजही ऐतिहासिक घटनांची साक्ष देतात. गावच्या सभोवताली घनदाट जंगल असून जंगली श्वापदे व विशेष करून अस्वल, गवीरेडे मोठ्या प्रमाणात आहेत. सडा गाव विकासापासून वंचित असून अद्याप या गावाला जाण्यासाठी पक्क्या स्वऊपाचा रस्ताही नाही. वाहतुकीच्या किंवा अन्य कोणत्याही सोयी-सुविधा नाहीत. गावात असलेली प्राथमिक शाळा देखील गेल्या दहा-बारा वर्षांपासून बंद करण्यात आली आहे.

दि. 24 आणि 25 डिसेंबर रोजी सडा येथील संपूर्ण किल्ला परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे. या दुर्ग संवर्धन मोहिमेच्या यशस्वीतेसाठी बेळगावच्या युवकांनी कंबर कसली असून पारवाड ग्राम पंचायत व कणकुंबी वनखात्याच्या परवानगीने सडा किल्ल्यात ही मोहीम राबविण्यात येणार आहे.  येथील नागरिकांना शेती जमीन नसल्याने येथील नागरिक गोवा व महाराष्ट्रात नोकरीसाठी स्थलांतरित झाले आहेत.

प्राथमिक सुविधांपासून वंचित

ऐतिहासिक परंपरा आणि वारसा लाभलेल्या या सडा गावात अद्याप शासकीय सुविधा पोहोचलेल्या नाहीत. येथे सुविधा पुरविल्यास सडा हे खानापूर तालुक्मयातील एक पर्यटनस्थळ होण्यास वेळ लागणार नाही. सडा गावाला जाण्यासाठी जंगलातून कच्चा रस्ता उपलब्ध आहे.

एकेकाळी म्हणजे 25 ते 30 वर्षांपूर्वी तीनशे-चारशे लोकवस्ती असलेल्या सडा गावात आज केवळ 30 ते 35 लोक आहेत. दोडामार्ग ते मांगेली असा रस्ता असल्याने मांगेलीपर्यंत बस आणि इतर वाहतूक सुरळीत सुरू आहे. केवळ कर्नाटक हद्दीतील रस्ता नसल्याने सडामार्गे नागरिकांची वाहतूक होऊ शकत नाही. सडा गावच्या रस्त्याला कर्नाटक वनखात्याने आडकाठी घातल्याने गावाबरोबरच किल्ल्याच्या विकासाला खीळ बसली आहे.

किल्ल्याची पाहणी

छत्रपती शंभूराजे परिवार व ‘ऑपरेशन मदत’च्या माध्यमातून’ स्वच्छ भारत अभियानांतर्गत’ येत्या 24 व 25 डिसेंबरला कणकुंबी भागातील दुर्गम सडा किल्ल्यावरील जीर्ण इमारतींच्या संवर्धनासाठी पूर्वतयारी म्हणून किल्ल्याची नुकतीच पाहणी केली गेली.

दि. 24 व 25 डिसेंबर रोजी सडा किल्ल्यावर दुर्गसंवर्धनाचे व मेडिकल हेल्थ-चेकअप पॅम्पचे आयोजन केले आहे. यावेळी सडा किल्ल्यावरील वाडा परिसरात, मंदिराच्या आवारात, गुहेत, इतिहासकालीन विहीर, गाव परिसरात पडलेला प्लास्टिकचा कचरा, मद्याच्या व पाण्याच्या बाटल्या, किल्ल्यावरील तटबंदीची स्वच्छता करणे, बुऊजावर ऐतिहासिक तोफ व्यवस्थित बसविणे. सडा गावातील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. यावेळी दीपोत्सवदेखील करण्यात येणार आहे. कार्यक्रमादरम्यान उपस्थित राहणाऱ्या कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाणार आहे.

या दोन दिवसीय निवासी शिबिराची तयारी करण्यासाठी सडा किल्ला परिसराला छत्रपती शंभूराजे परिवार व ‘ऑपरेशन मदत’ संस्थेच्या कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाहणी केली. यावेळी सडा गावकऱ्यांशी चर्चा करून निवासी व्यवस्था, मेडिकल पॅम्पची व्यवस्था, जेवणाची सोय, गोळा केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट, माहिती फलक व इतर तयारीसाठी महत्त्वाची चर्चा करण्यात आली.

याप्रसंगी विठ्ठल देसाई, सौरभ सांबरेकर, भाऊराव पाटील, ज्ञानेश्वर कदम, पवन मोरे, वैजू सांबरेकर, राजू तारिहाळकर, संजय पाटील तसेच व्हिक्टर फ्रान्सिस, शॉन ठाकुर, माऊती गोरल व राहुल पाटील उपस्थित होते.

Related Stories

अपघातात हत्तरवाडच्या युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni

जिल्हय़ातील 80 हजार विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

Amit Kulkarni

अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

tarunbharat

जिल्हय़ातील 951 परप्रांतियांना मिळाला रेशनवरील तांदुळ

Patil_p

सौंदत्ती नगरपरिषदेकडून स्वीकारले जाणार विविध योजनांसाठी अर्ज

Rohit Salunke

सीमाहद्दीवरील रस्ता… नको रे बाबा…

Amit Kulkarni