एनआयआरएफ मानांकन यादी जाहीर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
नॅशनल इन्स्टीटय़ूशनल रँकिंग प्रेमवर्कचे (एनआयआरएफ) मानांकन जारी करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी शुक्रवारी याची घोषणा केली आहे. मानांकनानुसार आयआयटी मद्रासला सर्वोत्कृष्ट शैक्षणिक संस्था घोषित करण्यात आले आहे. आयआयटी मद्रासला सलग चौथ्या वर्षी हा मान मिळाला आहे. तर सलग सातव्या वर्षी इंजिनियरिंग कॉलेजांमध्ये पहिला क्रमांक प्राप्त झाला आहे.
एनआयआरएफ मानांकन 2022 11 शेणींमध्ये म्हणजेच सर्वंकष, विद्यापीठ, व्यवस्थापन, महाविद्यालय, फार्मसी, वैद्यकीय, इंजिनियरिंग, स्थापत्यशास्त्र, एआरआयआयए, कायदा आणि संशोधन संस्थेसाठी जारी करण्यात आले आहे. आयआयटी मद्रासने सलग चौथ्या वर्षी सर्वंकष शैक्षणिक संस्था होण्याचा मान मिळविला आहे. तसेच सर्वंकष शैक्षणिक संस्थेच्या शेणीत दुसरे तर विद्यापीठाच्या शेणीत आयआयएससी बेंगळूरने पहिला क्रमांक पटकाविला आहे. तिसरे स्थान आयआयटी पवई, चौथे स्थान आयआयटी दिल्ली तर पाचवे स्थान आयआयटी कानपूरला प्राप्त झाले आहे.
विद्यापीठांच्या शेणीत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने दुसरे, दिल्लीतील जामिया मिलिया इस्लामियाने तिसरे, कोलकात्यातील यादवपूर विद्यापीठाने चौथे तर कोइम्बतूरमधील अमृता विश्व विद्यापीठाने पाचवे स्थान मिळविले आहे.
भारतातील सर्वोत्कृष्ट व्यवस्थापकीय शिक्षणाच्या शेणीत आयआयएम अहमदाबादला पहिला क्रमांक मिळाला आहे. आयआयएम बेंगळूरने दुसरे आणि आयआयएम कलकत्ताने तिसरे स्थान मिळविले आहे. महाविद्यालयांच्या शेणीत मिरांडा हाउसने पहिले, हिंदू कॉलेजने दुसरे स्थान, प्रेसिडेन्सी कॉलेजने तिसरे स्थान तर लोयला कॉलेज चेन्नईने चौथे स्थान पटकाविले आहे.
शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकनात नवी दिल्लीतील एम्सला सर्वोत्कृष्ट वैद्यकीय महाविद्यालयाचा मान मिळाला. तर चेन्नईतील सविता इन्स्टीटय़ूट ऑफ मेडिकल अँड टेक्निकल सायन्सेसला सर्वोत्कृष्ट दंतवैद्यकीय महाविद्यालय घोषित करण्यात आले आहे.
आघाडीच्या शैक्षणिक संस्था
पहिले स्थान ः आयआयटी मद्रास
गुण ः 87.59
दुसरे स्थान ः आयआयएससी, बेंगळूर
गुण ः 83.57
तिसरे स्थान ः आयआयटी पवई
गुण ः 82.35
चौथे स्थान ः आयआयटी दिल्ली
गुण ः 82.22
पाचवे स्थान ः आयआयटी कानपूर
गुण ः 77.83
सहावे स्थान ः आयआयटी खडगपूर
गुण ः 75.94
सातवे स्थान ः आयआयटी रुडकी
गुण ः 71.48
आठवे स्थान ः आयआयटी गुवाहाटी
गुण ः 69.75
नववे स्थान ः एम्स
गुण ः 69.57
दहावे स्थान ः जेएनयू
गुण ः 67.25