Tarun Bharat

इलाक्किया दासन, श्रावणी नंदा जलद धावपटू

वृत्तसंस्था /बेंगळूर

येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय खुल्या ऍथलेटिक्स स्पर्धेत रविवारी रेल्वेचा धावपटू व्ही. के. इलाक्किया दासन आणि ओडिशाची श्रावणी नंदा हे अनुक्रमे पुरुष आणि महिला विभागातील जलद धावपटू ठरले. त्याचप्रमाणे गोळाफेकीमध्ये तजिंदरपाल सिंगने प्रथम स्थानासह सुवर्णपदक पटकाविले.

या स्पर्धेत रविवारी मुसळधार पावसामुळे अनेक क्रीडा प्रकारांमध्ये अडथळा निर्माण झाला. पुरुषांच्या गोळाफेकमध्ये सेनादलाच्या तजिंदरपाल सिंग तूरने 20.68 मीटरचे अंतर नोंदवित प्रथम स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात तजिंदरपाल सिंगने दोनवेळा केलेल्या प्रयत्नात 20 मीटरचा टप्पा ओलांडला. त्याचप्रमाणे करणवीर सिंगने 20 मीटरपेक्षा अधिक गोळाफेक करत दुसरे स्थान पटकाविले.

रेल्वेचा धावपटू 27 वषीय व्ही. के. इलाक्किया दासनने पुरुषांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 10.37 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले. सेनादलाच्या हरजित सिंगने या क्रीडा प्रकारात दुसरे स्थान पटकाविले. दिल्लीच्या शिवम वैष्णवकडून मात्र अंतिम फेरीत पूर्ण निराशा झाली. त्याला आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत ओडिशाची धावपटू श्रावणी नंदाने 11.55 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले. तर रेल्वेच्या हिमाश्री रॉयने 11.56 सेकंदाचा अवधी घेत दुसरे स्थान तसेच तामिळनाडू अर्चना सुसेंद्रनने 11.58 सेकंदाचा अवधी घेत तिसरे स्थान घेतले. महाराष्ट्राच्या दियांद्रा व्हॅलेडेरेसला पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. महिलांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत तामिळनाडूच्या 23 वषीय शुभा वेंकटेशनने 52.57 सेकंदाचा अवधी घेत सुवर्ण, रेल्वेच्या सोनिया वैश्यने रौप्य तर रेल्वेच्या आर. विथिया रामराजने तिसरे स्थान मिळविले. पुरुषांच्या 400 मीटर धावण्याच्या शर्यतीत सेनादलाच्या 23 वषीय राजेश रमेशने 46.63 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर सेनादलाच्या आयुष दबासने 46.86 सेकंदाचा अवधी घेत रौप्यपदक मिळविले. पुरुषांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत सेनादलाच्या 17 वषीय परवेझ खानने 3 मिनिटे 46.41 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक पटकावले. मध्यप्रदेशच्या अभिषेकसिंग ठाकुरने रौप्य तर रितेश ओहरेने कास्यपदक घेतले. महिलांच्या 1500 मीटर धावण्याच्या शर्यतीत मध्यप्रदेशच्या के. एम. दीक्षाने 4 मिनिटे 23.03 सेकंदाचा अवधी घेत सुवर्णपदक तर रेल्वेच्या अंकिता दयानीने रौप्यपदक मिळविले. या स्पर्धेत हेप्थेलॉन हा क्रीडा प्रकार समाप्त झाला असून स्वप्ना बर्मनने 5,798 गुण घेत सुवर्णपदक मिळविले.

Related Stories

आयटीएफतर्फे पॅनेलची स्थापना

Patil_p

राष्ट्रकुल हॉकीतून भारताची माघार

Patil_p

सेबॅस्टियन व्हेटेलचा फेरारीला लवकरच निरोप

Patil_p

पाक कसोटी संघात फवाद आलमचा समावेश

Patil_p

बांगलादेशसमोर आज इंग्लंडचे तगडे आव्हान

Patil_p

धोनीचा संताप …अन् पंचांनी चक्क ‘तो’ निर्णयच बदलला!

Omkar B