Tarun Bharat

कझाकची इलेना रीबाकिना ‘विम्बल्डन सम्राज्ञी’

महिला एकेरीतील अंतिम लढतीत टय़ुनिशियाच्या जेबॉरवर मात

विम्बल्डन / वृत्तसंस्था

कझाकस्तानची 17 वी मानांकित इलेना रीबाकिना यंदाची विम्बल्डन सम्राज्ञी ठरली. येथील सेंटर कोर्टवर शनिवारी सायंकाळी रंगलेल्या अंतिम लढतीत तिने टय़ुनिशियाच्या जेबॉरचे आव्हान 3-6, 6-2, 6-2 असे संपुष्टात आणले. वास्तविक, इलेनाला पहिला सेट गमवावा लागला होता. मात्र, नंतरचे सलग दोन्ही सेट्स एकतर्फी फरकाने जिंकत तिने जेतेपदावर शिक्कामोर्तब केले.

Kazakhstan’s Elena Rybakina returns to Tunisia’s Ons Jabeur in the final of the women’s singles on day thirteen of the Wimbledon tennis championships in London, Saturday, July 9, 2022. AP/PTI(AP07_09_2022_000241B)

प्रारंभी, टय़ुनिशियाच्या जेबॉरने पहिला सेट 6-3 अशा एकतर्फी फरकाने जिंकत महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. पण, यानंतरही तिला धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. दुसऱया सेटमध्ये जेबॉरने उत्तम सुरुवात केली असली तरी हा टेम्पो तिला कायम राखता आला नाही. रीबाकिनाने दुसरा सेट 6-2 तर तिसरा सेट देखील 6-2 अशाच फरकाने जिंकत विजय अक्षरशः खेचून आणला.

रीबाकिना ही कझाकस्तानचे प्रतिनिधीत्व करत एकेरीतील ग्रँडस्लॅम जिंकणारी इतिहासातील पहिली खेळाडू ठरली आहे. रशियाचा जन्म असलेल्या रीबाकिनाने 2018 मध्ये कझाकस्तानचे नागरिकत्व स्वीकारले. ऑल इंग्लंड क्लबवरील यंदाच्या मोहिमेत रीबाकिनाने 7 विजयात केवळ दोनच सेट गमावले. मागील महिन्यात 23 व्या वर्षात पदार्पण करणारी रीबाकिना ही पेत्रा क्विटोव्हानंतर विम्बल्डन जिंकणारी सर्वात तरुण खेळाडू ठरली. पेत्रा क्विटोव्हाने 2011 मध्ये वयाच्या 21 व्या वर्षी विम्बल्डन जिंकण्याचा पराक्रम गाजवला आहे.  

रशियाची इलेना कझाकस्तानकडून का खेळते?

इलेना रीबाकिना आंतरराष्ट्रीय टेनिसमध्ये कझाकस्तानचे प्रतिनिधीत्व करत आली असली तरी तिचा जन्म रशियातील आहे आणि आणखी आश्चर्य म्हणजे अद्याप तिचे वास्तव्यही मॉस्को शहरातच असते. कझाकस्तानच्या टेनिस फेडरेशनने आश्वासक भासणाऱया रशियातील खेळाडूंना हेरत त्यांना गलेलठ्ठ पॅकेज देऊ केले आणि याच कारणामुळे इलेना रिबाकिनासह अलेक्झांडर बबलिक, युलिया पुतिंत्सेवा असे खेळाडू रशियाऐवजी कझाकस्तान संघातून खेळत आले आहेत.

महिला दुहेरीत मेर्टेन्स-शुआई अंतिम फेरीत

टॉप सीडेड एलिसे मर्टेन्स व झँग शुआई यांनी शुक्रवारी बिगरमानांकित डॅनिएले कॉलिन्स व क्रॅवझिक यांचा संघर्षमय लढतीत पराभव करत महिला दुहेरीच्या अंतिम फेरीतील स्थान निश्चित केले. एकत्रित केवळ तिसरीच स्पर्धा खेळत असलेल्या या जोडीने कॉलिन-क्रॅवझिक जोडीचा 6-2, 3-6, 6-3 अशा फरकाने पराभव केला. प्राथमिक टप्प्याप्रमाणेच येथेही झँगने व्हॉलीजवर तर मर्टेन्सने परफेक्ट सर्व्हिसवर पुरेपूर भर दिला आणि ही बाब त्यांच्या विजयात निर्णायक ठरली. मर्टेन्स व झँग यांनी या आठवडय़ात एकही सेट गमावला नसून हीच घोडदौड आता फायनलमध्येही कायम राखण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

आता महिला दुहेरीच्या फायनलमध्ये मर्टेन्स व झँग यांचा द्वितीय मानांकित बार्बोरा क्रॅजिकोव्हा व कॅटेरिना सिनियाकोव्हा यांच्याविरुद्ध मुकाबला होईल. अन्य एका उपांत्य लढतीत क्रॅजिकोव्हा व सिनियाकोव्हा यांचा 6-2, 6-2 अशा सरळ सेट्समध्ये पराभव करत अंतिम फेरीतील पहिले स्थान निश्चित केले होते.

पुरुष एकेरीतील जेतेपदासाठी जोकोविक-किर्गिओस आज आमनेसामने

सर्बियाचा अव्वलमानांकित नोव्हॅक जोकोविक व ऑस्ट्रेलियाचा निक किर्गिओस आज (रविवार दि. 10) पुरुष एकेरीतील फायनलमध्ये आमनेसामने भिडणार आहेत. किर्गिओसने एखाद्या ग्रँडस्लॅम फायनलमध्ये धडक देण्याची ही पहिलीच वेळ आहे. मात्र, जोकोविकने त्याला कमी लेखण्याची चूक करणार नसल्याचे म्हटले.

‘जो खेळाडू आजवर एकही ग्रँडस्लॅम फायनल खेळला नाही, त्याच्याविरुद्ध फायनलमध्ये लढणे माझ्यासाठी हिताचे असू शकते. पण, याचवेळी या दडपणाच्या लढतीत त्याचा खेळ बहरला तर ही लढत संघर्षपूर्ण ठरु शकते. वेगवान, बिनचूक सर्व्हिस हे किर्गिओससाठी बलस्थान ठरत आले असून या बळावर तो आक्रमक खेळावर भर देईल, अशी माझी अपेक्षा आहे’, याचा जोकोविकने यावेळी उल्लेख केला.

35 वर्षीय जोकोविक यंदा सातव्या विम्बल्डन जेतेपदासाठी महत्त्वाकांक्षी असून येथे विजय मिळवता आल्यास त्याचे हे कारकिर्दीतील 21 वे मेजर टायटल असेल.  यात यश आल्यास तो 22 वेळचा ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालच्या विक्रमासमीप पोहोचू शकेल.

Related Stories

रविंदरची जेतेपदाकडे वाटचाल,

Patil_p

कॅनडा डेव्हिस चषकाचा पहिल्यांदाच मानकरी

Patil_p

आरसीबी बनला प्लेऑफमधील तिसरा संघ

Patil_p

नेदरलँड्सचा संयुक्त अरब अमिरातवर थरारक विजय

Amit Kulkarni

हार्दिक पंडय़ा, रविंद्र जडेजाची उणीव जाणवली

Patil_p

कर्नाटक, महाराष्ट्र, उत्तरप्रदेश, पंजाब उपांत्य फेरीत

Patil_p