Tarun Bharat

अवैध धंद्यांना आळा घालण्यात यावा: शिवसेनेची मागणी

Illegal businesses should be curbed: Shiv Sena’s demand

युवकांच्या भविष्यासाठी सावंतवाडी तालक्यातील अवैध धंद्यांना आळा घालण्यात यावा अशी मागणी  शिवसेनेने जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

सावंतवाडी तालुक्यामध्ये महाराष्ट्राच्या हद्दीवर्ती पोलीस चेक पोस्ट इन्सुली खामदेव नाका , सातार्डा, आरोंदा व आंबोली येथे आहेत . चेक पोस्टवर गाडी  तपासणी केली जाते. परंतु चेक पोस्ट मार्गे जिल्ह्यात प्रवेश केलेल्या गाड्यांवर दारूचे बॉक्स सापडतात. तसेच मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर पडलेल्या मटक्याच्या चिठ्ठ्या दिसतात ,तसेच रात्रीच्या वेळी मोठ्या प्रमाणात जुगार अड्डे चालू असल्याची चर्चा तालुक्यात जोरदार आहे .अशा प्रकारे अवैध धंद्यांना उत आल्यामुळे सावंतवाडी तालुक्यात मारामारी, चोरी, युवकांमध्ये व्यसनाचे प्रमाण ,लैंगिक अत्याचार अशा आरोपांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे . 

परंतु प्रामुख्याने  आरोपींमध्ये तरुण युवकांची मोठी संख्या आहे, ही गंभीर बाब आहे. त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील तरुणाई अवैद्य धंद्यांना मोठ्या प्रमाणात बळी पडत असल्याचे बोलले जात आहे. सदर विषयावर पोलीस ,चेक पोस्टवर कार्यरत पोलीस अधिकारी नक्कीच आपली जबाबदारी पार पाडतात काय? गावांमध्ये बीट हवालदार योग्यरित्या आपली कर्तव्य व जबाबदारी  पार पाडतात काय ?हे पाहणे गरजेचे आहे . 

सावंतवाडी / प्रतिनिधी 

Related Stories

सीआरझेडच्या वावटळीत सापडला गुहागरचा पर्यटन विकास

Patil_p

किनारपट्टीवर लाटांचे तांडव, मिऱया किनाऱयाला तडाखा

Patil_p

जिल्हय़ाला साडेपाच कोटीचा निधी प्राप्त

NIKHIL_N

एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना रुग्णालयातून परत जाता कामा नये: मुख्यमंत्री ठाकरे यांचे निर्देश

Archana Banage

सावंतवाडीत भरवस्तीत चोरटय़ांचा धुडगूस

NIKHIL_N

रत्नागिरीतही आढळले मृत कावळे

Patil_p