Tarun Bharat

गगनगडावरील दर्ग्याशेजारील अवैध बांधकामे रोखावीत

Advertisements

हिंदु एकता आंदोलन व हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची मागणी

प्रतिनिधी/कोल्हापूर

गगनबावडा तालुक्यातील गगनगडावरील दर्ग्याशेजारी सुरु असलेली अवैध बांधकामे रोखावीत, अशी मागणी सातारा हिंदु एकता आंदोलन व कोल्हापूरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे बुधवारी प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे केली.

हिंदु एकता आंदोलनचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर यांच्या शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हंटले आहे की, गगनगिरी गड हे हिंदु समाजाचे धार्मिकस्थळ आहे. त्यामुळे जिह्यातील व परजिह्यातील अनेक भाविकांच्या भावना या ठिकाणी जोडल्या आहेत. गडावर प्राचिन काळातील लेणी असून त्याचे आता मंदिरात रुपांतर झाले आहे. तसेच गडावर चैतन्य गगनगिरी महाराजांचा मठ आहे. या मठाच्या पश्चिमेस एक दर्गा असून त्याच्या शेजारी अवैध बांधकामे सुरु आहेत. ती तात्काळ थांबवावीत. अन्यथा सामाजिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे.

शिष्टमंडळात महेश उरसाल, प्रकाश सरनाईक, सुनील पाटील, हिंदुराव शेळके, ऍड. सुधीर जोशी-वंदुरकर, सूरज चव्हाण, गजानन तोडकर, अनिल कोडोलीकर आदींचा समावेश होता.

Related Stories

दगडफेक काय करताय?, हिंमत असेल तर समोर या – चित्रा वाघ

Abhijeet Shinde

दिवाळीच्या मुहूर्तावर जनावरांचा बाजार सुरु

Abhijeet Shinde

कोल्हापूर महापालिका प्रशासनात `सापशिडी’चा खेळ !

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री ठाकरे आणि संभाजीराजे यांच्यात बुधवारी`वर्षा’वर बैठक

Abhijeet Shinde

कोल्हापूर : दुग्ध व्यवसायामुळेच शेतक-यांची आर्थिक प्रगती : चंद्रकांत निऊंगरे

Abhijeet Shinde

हातकणंगलेतील प्रभाग रचनेला उच्च न्यायालयात आव्हान

Abhijeet Khandekar
error: Content is protected !!