आगशी पोलिसांनी केली कारवाई
प्रतिनिधी /पणजी
गोवा वेल्हा येथे मद्य विक्रीच्या दुकानात बेकायदेशीर मद्य साठा केल्या प्रकरणी आगशी पोलिसांनी 6 लाख रुपये किमंतीचे मद्य जप्त केले आहे. नंतर ते मद्य अबकारी खात्याकडे देण्यात आले आहे.
येत्या 10 ऑगस्ट रोजी पंचायत निवडणूका होणार अल्याने मद्यालयांबाबत निवणूक आयोगाने कडक धोरण अवलंबले आहे. पोलीस स्थानकाचे निरीक्षक विक्रम नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रफुल्ल गिरी, कॉन्स्टेबल पुरेश हणखणकर, शंकेश मांद्रसोकर, रोहीत यादव, महेश गावझे, श्रीराम बुडे यांनी ही कारवाई केली आहे.