अन्न व सार्वजनिक वितरण विभाग आणि हिरबागेवाडी पोलिसांनी रेशन तांदळाच्या अवैध तस्करी प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी शनिवारी रात्री अलारवाड पुलाजवळील सर्व्हिस रोडवर ही कारवाई केली.
मूळचे कोल्हापूरचे सदानंद लक्ष्मण पाटील यांच्याकडून 42 हजार रुपये किमतीचा 15 क्विंटल तांदूळ आणि 1 लाख 30 हजार रुपये किमतीची लॉरी जप्त करण्यात आली आहे. तसेच बैलहोंगल तालुक्यातील मरकट्टी येथील रहिवासी यल्लाप्पा भीमशेप्पा बजंगी यांना अटक करून 47 हजार रुपये किमतीचा 17 क्विंटल तांदूळ आणि 80 हजार रुपये किमतीचा टेम्पो जप्त करण्यात आला आहे.
याप्रकरणी हिरबागेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.