Tarun Bharat

यरगट्टीजवळ बेकायदा तांदूळसाठा जप्त

Advertisements

मुरगोड पोलिसांची कारवाई : एकाला अटक, एकजण फरार : पोलिसांकडून तपास सुरू

प्रतिनिधी /बेळगाव

यरगट्टीजवळ 25 टन बेकायदा रेशनचा तांदूळ जप्त करण्यात आला आहे. मुरगोड पोलिसांनी शनिवारी ही कारवाई केली आहे. एका तरुणाला अटक करण्यात आली असून आणखी एकजण फरारी झाला आहे.

पाच लाख रुपये किमतीचा 500 पोती तांदूळ पोलिसांनी जप्त केला आहे. बेकायदा तांदूळ वाहतुकीसाठी वापरण्यात आलेला ट्रकही जप्त करण्यात आला असून सौंदत्तीहून हुक्केरीला जाताना ही कारवाई करण्यात आली आहे. मुरगोड पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

रफिक अकनाबादशहा देसाई, रा. बिरेश्वरनगर, संकेश्वर याला अटक करण्यात आली असून रमेश अडिव्याप्पा गाणगेर, रा. सौंदत्ती हा फरारी झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. हा साठा कुठून जमविण्यात आला, याचा तपास करण्यात येत आहे.

यासंबंधी सौंदत्तीचे तहसीलदार, अन्ननिरीक्षक आनंद लक्काप्पा रावळ यांनी दोन दिवसांपूर्वी फिर्याद दिली आहे. मुरगोडचे पोलीस निरीक्षक मौनेश्वर मालीपाटील व त्यांच्या सहकाऱयांनी ट्रक अडवून ही कारवाई केली असून एमएच 09, सीए 3662 क्रमांकाचा ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.

Related Stories

Kolhapur Jaggeri कर्नाटकी गुळाला कोल्हापूरचे लेबल लावल्यास कारवाई

Abhijeet Khandekar

तहसिलदार कार्यालयातील ऑनलाईन कामकाज ठप्पच, नागरिकांचीही पाठ

Patil_p

‘कुंदकला’तर्फे प्रशिक्षण कार्यशाळेचा शुभारंभ

Omkar B

पीओपीबाबत प्रशासनाने धोरण जाहीर करावे

Patil_p

हुन्नूर येथे मृतदेह ठेवून निदर्शन

Patil_p

‘स्वरकुसुम’ कार्यक्रमाला रसिकांचा प्रतिसाद

Amit Kulkarni
error: Content is protected !!