Tarun Bharat

कर्नाटक पोलिसांकडून बेकायदा स्पिरीट जप्त

अन्य घटनेत अबकारी विभागाने चोरटी दारू पकडली

प्रतिनिधी /काणकोण

गोव्यातून कर्नाटकात बेकायदा स्पिरीट घेऊन जाणारे एक वाहन कर्नाटक पोलिसांनी जप्त केले असून या वाहनात 93 हजार रु. किमतीचे स्पिरीट होते. या वाहनात असलेल्या एका टॉयलेट क्लिनर तयार करणाऱया कंपनीच्या बाटल्यांमध्ये हे स्पिरीट लपवून ठेवण्यात आले होते. स्पिरीट आणि अन्य साहित्य त्याचप्रमाणे वाहन मिळून कर्नाटक पोलिसांनी जप्त केलेल्या मालाची किंमत 23 लाख रु. इतकी धरली असून जप्त केलेले वाहन आणि अन्य साहित्य कारवारच्या अबकारी विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

पोळे आणि माजाळी हे दोन्ही चेकनाके पार करून गेलेले हे वाहन कारवार-सदाशिवगड मार्गावर कर्नाटकाच्या पोलिसांनी पकडले. या स्पिरीटचा वापर दारूसाठी करण्याचा हेतू असल्याचा संशय कर्नाटक पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, गोव्यातून कर्नाटकात बेकायदा दारूच्या बाटल्या घेऊन जाणारी एक स्विफ्ट कार माजाळी चेकनाक्यावर अबकारी खात्याने पकडली. चोरटी दारू घेऊन जाणारे सदर वाहन सध्या अबकारी खात्याच्या ताब्यात असून त्यात 23 हजार रु. किमतीची दारू होती, अशी माहिती माजाळी चेकनाक्यावरील अबकारी खात्याच्या कर्मचाऱयांनी दिली.

Related Stories

फोंडय़ात ऐन थंडीत, पावसाच्या सरी

Amit Kulkarni

लोकमान्य महिला सन्मान डिपोझिट स्कीमचे उद्घाटन

Amit Kulkarni

अंगणवाडी विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देणार

Amit Kulkarni

कॅसिनो बंद करा, आंदोलन मागे घेतो

Patil_p

गोव्याच्या साईभक्तावर काळाचा घाला, घुणकी येथे अपघाती मृत्यू

Archana Banage

सर्वपक्षीय शिष्टमंडळाला ऑक्सिजन पुरवठा सुविधेची पाहणी करु द्यावी

Amit Kulkarni