प्रतिनिधी /म्हापसा
श्री दत्त पद्मनाभ पीठ संचालित संत समाज कायसूवची सन् 2022 ते 2025 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नूतन समितीच्या अध्यक्षपदी आनंद हरमलकर तर सचिवपदी अशोक कळंगुटकर यांची निवड करण्यात आली. समितीची घोषणा पीठाचे केंद्रीय पदाधिकारी वासुदेव गांवस तसेच संत समाज कायसुवचे क्षेत्रिय प्रमुख गजानन मांदेकर व समितीचे माजी सदस्य व गुरुबंधू-भगिनींच्या उपस्थितीत करण्यात आली.
नूतन समिती पुढीलप्रमाणे ः अध्यक्ष आनंद हरमलकर, उपाध्यक्ष विश्वास गांवकर, सचिव अशोक कळंगुटकर, सहसचिव रामा गांवकर, खजिनदार स्वप्नेश बेतकर, सहखजिनदार सुदेश ताम्हणकर, सदस्य बाबली हळर्णकर, संदेश ताम्हणकर व प्राप्ती मडगांवकर. पंढरी मडगांवकर यांच्या गृहस्थाश्रमी संत सामागमप्रसंगी पू. सद्गुरु माऊलींच्या जयघोषात सदर समिती निवडण्यात आली. माजी अध्यक्ष वेदेश बाणावलकर यांनी आपल्या काळांत समितीने चांगली साथ दिल्याबद्दल आभार मानले.