जुन्या पी. बी. रोडवरील कारखान्यात चोरी
प्रतिनिधी/ बेळगाव
जुन्या पी. बी. रोडवरील एका कारखान्यात चोरी झाली आहे. पत्र्याचा दरवाजा उचकटून 300 कास्टिंग जॉब व दोन पोती स्क्रॅप पळविण्यात आले असून या प्रकरणात चार महिलांची छबी सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाली आहे. शनिवारी सकाळी चोरीची ही घटना घडली आहे.
जुन्या पी. बी. रोडवरील रामचंद्र इंजिनिअरिंग वर्क्स या कारखान्यात चोरीची घटना घडली आहे. शनिवारी सकाळी 6 ते 6.30 यावेळेत कास्टींग जॉब व स्क्रॅप पळविण्यात आले असून शाम कणबरकर यांनी मार्केट पोलिसांना या घटनेची माहिती दिली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीचे फुटेज ताब्यात घेतले आहेत.
चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ
पत्र्याचा दरवाजा उचकटून कारखान्यात प्रवेश करण्यात आला आहे. या कारखान्यात कास्टींग जॉब बनविले जातात. 300 जॉब पळविण्यात आले आहेत. हा प्रकार उघकडीस आल्यानंतर मार्केट पोलिसांना माहिती देण्यात आली. वर्दळीच्या ठिकाणी झालेल्या या चोरीच्या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
चोरीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱयात कैद झाला आहे. चार महिलांचा यामध्ये सहभाग असल्याचे दिसून येते. कारखान्यातून बाहेर काढलेले कास्टींग जॉब व स्क्रॅप पोत्यातून डोक्मयावरून उचलून नेताना महिला दिसून येत आहेत. शनिवारी रात्रीपर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल झाला नव्हता.
चोऱया, घरफोडय़ात वाढ
बेळगाव शहर व उपनगरांत चोऱया, घरफोडय़ा वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱयात चोरटय़ांची छबी कैद झाली आहे. त्यावरून चोरटय़ांचा माग काढला जात आहे. कारखान्यात चोरी करणाऱया महिला कोण? याचा तपास करण्यात येत आहे.