रशिया-युक्रेन युद्धाचा प्रभाव : कच्च्या तेलाच्या किमतींचाही परिणाम
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय नाणे निधीने (आयएमएफ) आर्थिक वर्ष 2022-23 करीता भारतासाठी जीडीपी अंदाज 80 बेसिस पाँईटने घटवून 8.2 टक्के नेंदवला आहे. जानेवारी 2022 मध्ये आयएमएफने जीडीपी विकासाचा अंदाज 9 टक्के राहणार असल्याचे सांगितले होते.
जीडीपी वाढीचा अंदाज बदलण्यामागे रशिया आणि युक्रेन यांच्यामधील युद्धजन्य परिस्थिती कारणीभूत असल्याचे आयएमएफने म्हटले आहे. सदरच्या नकारात्मक वातावरणात कच्च्या तेलाच्या किमती वाढत गेल्या असून दुसरीकडे देशातला वापर व खासगी गुंतवणुकीवर मोठय़ा प्रमाणात परिणाम होत गेल्याचे दिसून आले.
आयएमएफने चालू आर्थिक वर्षासाठी भारताचा वाढीचा दर घटविला आहे, परंतु सध्याला स्थानिक प्रोजेक्शन्सच्या तुलनेत अधिकचे प्रमाण राहिले आहे. उदा ः रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय)ने आर्थिक वर्ष 2023 साठी 7.2 टक्के जीडीपी अंदाज राहणार असल्याचे नोंदवले होते. सांख्यिकी मंत्रालयानुसार आर्थिक वर्ष 2022 मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा दर हा 8.9 टक्के राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.