Tarun Bharat

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतंर्गत ‘सागर मित्रां’ची नियुक्ती करा- रविकिरण तोरसकर

Advertisements

Immediately appoint ‘Sagar Mitra’ under Prime Minister’s Fisheries Fund Scheme – Ravikiran Toraskar

पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतंर्गत ‘सागर मित्रां’ची तात्काळ नियुक्ती करा, अशी मागणी भाजप मच्छीमार सेलचे पदाधिकारी तथा पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचे कोकण संयोजक रविकिरण तोरसकर यांनी राज्याच्या मत्स्य व्यवसाय मंत्र्यांकडे केली आहे.

तोरसकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या मत्स्य उत्पादनात भर घालण्यासाठी नीलक्रांती ही योजना सन २०१४ साली सुरू केली. सदर योजनेअंतर्गत सन २०१९ पासून प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना देशभरात लागू केली. सुमारे वीस हजार कोटी रुपयाची व मच्छीमार तसेच मत्स्य शेतकरी यांना ४० ते ६० टक्के पर्यंत अनुदान असणारी अशी ही योजना अतिशय अल्प कालावधीत लोकप्रिय झाली. खारे, निमखारे व गोड्या पाण्यातील मत्स्य शेती,शोभिवंत मत्स्य पालन, मत्स्य व्यवसायातील सुविधांचे आधुनिकीकरण, खोल समुद्रातील मासेमारी, मच्छीमारांसाठी वैयक्तिक लाभाच्या योजना व इतर पायाभूत सुविधांसाठी असलेली सदरची प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना मत्स्य व्यवसायातील सर्व घटकास लाभदायक ठरत आहे. सदरची योजना देशातील जास्तीत जास्त घटकांपर्यंत पोहोचावी यासाठी सरकार व लाभार्थी यामधील दुवा म्हणून कंत्राटी पद्धतीवर सागर मित्र या पदाची निर्मिती करण्यात आली. सागर मित्र या पदावर स्थानिक बेरोजगार ,परंतु मत्स्य व्यवसायाशी संबंधित शैक्षणिक आर्हता असणाऱ्या युवक युवतींची भरती करण्यात आली. सन २०२० ते २०२१ यादरम्यान नियुक्त सागर मित्रांनी अतिशय उत्कृष्टरित्या काम केले. योजने संदर्भात प्रशासकीय यंत्रणा व लाभार्थी यामध्ये समन्वय साधत इच्छुक व्यक्तींना, योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन तसेच प्रोत्साहित केले. परंतु सन २०२२- २३ या कालावधीत सागर मित्र या पदासाठी नियुक्ती झालेली नाही.

Related Stories

निवडणुक खर्चावर लक्ष ठेवण्यासाठी पणजीत नियंत्रण कक्ष

Abhijeet Khandekar

पर्यटनदिनी जिह्यातील हॉटेल्सवर लाल झेंडा फडकणार!

Patil_p

मालवण गाबित समाजातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव होणार

Ganeshprasad Gogate

गवळी समाजातील पूरग्रस्ताला आर्थिक मदत

NIKHIL_N

रत्नागिरी नगर परिषदेचे बदलते धोरण

Patil_p

जंगलातून पायपीट करत धनगर कुटुंबांना धान्य घरपोच

NIKHIL_N
error: Content is protected !!