मुस्लीम बांधवांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन
प्रतिनिधी /बेळगाव
वंटमुरी येथील मशिदीची उभारणी करण्यासाठी निर्मिती केंद्राकडून 21 लाख रुपये मंजूर झाले होते. मात्र केवळ साडेनऊ लाख खर्च करून उर्वरित रक्कम तशीच संबंधित निर्मिती केंद्राकडे शिल्लक आहे. मात्र संबंधित केंद्राचे अधिकारी उद्धट उत्तरे देत असून तातडीने ही मशिद पूर्ण करण्यासाठी पाऊले उचलावीत, अशी मागणी मशीद-ए-क्मयुबा मुस्लीम जमात (सुन्नी) यांच्यावतीने करण्यात आली आहे.
वंटमुरी येथे मशिदीसाठी सरकारकडून 21 लाखांचा निधी मंजूर झाला होता. ते काम निर्मिती केंद्रांच्या माध्यमातून करण्यात येत होते. मात्र हे काम अजूनही पूर्ण झाले नाही. याबाबत निर्मिती केंद्राचे प्रोजेक्ट मॅनेजर शेखर गौड यांच्याशी संपर्क साधला असता ते उद्धट उत्तरे देत आहेत, असे या निवेदनात म्हटले आहे. आतापर्यंत साडेनऊ लाख रुपये खर्च करण्यात आले. उर्वरित रक्कम तातडीने खर्च करावी आणि मशिदीचे काम पूर्ण करावे, अशी मागणी केली असता आम्ही पूर्ण रक्कम खर्च केली आहे, असे ते सांगत आहेत. तेव्हा याबाबत तातडीने चौकशी करून खर्चाचा अहवाल तपासावा आणि संबंधित कंत्राटदाराला पुन्हा काम करण्यास सांगावे, असे या निवेदनात म्हटले आहे. यावेळी जमातचे अध्यक्ष ए. के. रवडीकर, एम. एम. पाटील, ए. के. नाईकवाडी, एन. आर. नवाज, आय. ए. मकानदार, इब्राहिम बस्सापुरी, ए. एम. मंजूर यांच्यासह नागरिक उपस्थित होते.