Tarun Bharat

न्यायालयासमोर गतिरोधक तातडीने बसवा

प्रतिनिधी /बेळगाव

स्मार्टसिटी अंतर्गत कामे सुरू आहेत. मात्र कामाचा दर्जा काही दिवसांतच उघडा पडत आहे. कित्तूर चन्नम्मा ते आरटीओ सर्कलपर्यंतच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले. त्यानंतर न्यायालयासमोर गतिरोधक बसविण्यात आले. मात्र काही दिवसांतच हे गतिरोधक उखडून गेले आणि त्या गतिरोधकामध्ये असलेले खिळे खुले झाले असून ते धोकादायक ठरत आहेत. गतिरोधक नसल्याने वाहने बेफाम चालविली जात आहेत. तेंव्हा तातडीने शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी होत आहे.

सतत वर्दळीचा असलेल्या या मुख्य रस्त्यावर शुक्रवारी सुदैवाने दोन वकील बचावले आहेत. गतिरोधक नसल्यामुळे भरधाव वाहने ये-जा करत होती. यावेळी दोन वकिलांना धडक बसणार होती. मात्र सुदैवाने ते बचावले आहेत. या ठिकाणी काही महिन्यापूर्वी गतिरोधक बसविण्यात आला होता. मात्र काही दिवसांतच हा गतिरोधक उखडला आहे. या गतिरोधकाला लोखंडी खिळे बसविण्यात आले होते. ते खिळे आता उघड्यावर पडले आहेत. त्यामुळे वाहने पंक्चर होण्याची भीतीही व्यक्त होत आहे. तेंव्हा तातडीने गतिरोधक बसवावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.

Related Stories

जमखंडीत विद्यार्थिनींनी पाहिला गुरु-शनिचा नजारा

Omkar B

उसाची बिले ताबडतोब देणार

Rohit Salunke

खादरवाडी येथील विठ्ठल-रखुमाई मंदिरात चोरी

Amit Kulkarni

मलबार गोल्ड अँड डायमंडस्ची शानदार सुरुवात

Amit Kulkarni

देसूरमध्ये निवडणूक मतपत्रिका फुटल्याने गोंधळ

Patil_p

तळय़ात-मळय़ात; मुले बुचकळय़ात

Amit Kulkarni