Tarun Bharat

चौथे रेल्वेगेटजवळील रस्त्याची दुरुस्ती तातडीने करा

Advertisements

गतिरोधकाची दुरवस्था : रस्त्यावर खड्डेच खड्डे

प्रतिनिधी /बेळगाव

अनगोळ येथील चौथे रेल्वेगेटजवळ खड्डय़ांचे साम्राज्य पसरले आहे. या ठिकाणी वाहन चालविताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. पावसामुळे हे खड्डे आणखीनच मोठे झाले असून, या ठिकाणाहून ये-जा करणे अवघड झाले आहे. तेव्हा तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण करण्यात आले. त्यामुळे चौथ्या गेटचेही रुंदीकरण करण्यात आले आहे. रस्त्याच्या मधोमध दुभाजक घालण्यात आला आहे आणि त्यानंतर दोन्ही बाजूला गतिरोधक बसविण्यात आले आहेत. हे गतिरोधक अशास्त्रीय पद्धतीने बसविण्यात आल्यामुळे या गतिरोधकावरून वाहने चालविणे अवघड झाले आहे. त्यातच खड्डे देखील आहेत. त्यामुळे या ठिकाणी अपघात घडण्याची शक्मयता आहे. तेव्हा तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून शास्त्रीय पद्धतीने गतिरोधक करावेत, अशी मागणी वाहनचालकांतून होत आहे. गतिरोधक ओलांडताना चारचाकी तसेच दुचाकी  वाहनांना त्रास होत आहे. गतिरोधकावर वाहन चढविताना व उतरविताना कारच्या खालील बाजूला गतिरोधक घासत आहे. त्यामुळे इंजिन आणि वाहनाचे नुकसान होत आहे. त्यामुळे त्याची उंची कमी करण्याची मागणी होत आहे.

Related Stories

सुपारी देऊन पत्नीचा खून? निपाणीतील घटना : पतीसह चौघे ताब्यात

Patil_p

बीएड् प्रवेशावरून आरसीयू कुलगुरु नरमले

Patil_p

महादेव सावकारवर गोळीबाराने भीमाकाठ हादरला

Patil_p

बेडकिहाळच्या ऐतिहासिक दसरा महोत्सवावर कोरोनाचे संकट

Patil_p

संस्थेच्या माध्यमातून अनेक कुटुंबे बनली मजबूत

Amit Kulkarni

आरपीडीच्या विद्यार्थ्यांकडून कलागुणांचे सादरीकरण

Amit Kulkarni
error: Content is protected !!