प्रतिनिधी /पेडणे
पेडणे येथील भगवती मंदिरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने 11 दिवसांच्या गणपतीचे वाजत गाजत धुमधडाक्मयात गांधीतीर खारेबांध येथे तेरेखोल नदीत विसर्जन करण्यात आले.
शनिवारी उत्तरपूजा झाल्यानंतर सामुदायिक साकडे घातल्यानंतर गणपतीचे वाजत गाजत गांधीतील खारेबांध येथे मूर्तीला आणण्यात आले. यावेळी मोठय़ा प्रमाणात भाविक उपस्थित होते. यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार परशुराम कोटकर, पेडणे मतदारसंघाचे आमदार प्रवीण आर्लेकर, मंडळ ट्रस्टचे पदाधिकारी मधुकर पालयेकर, हरिश्चंद्र नागवेकर, उत्सव समितीचे अध्यक्ष प्रवीण कोटकर, सुभाष कोरगावकर, चंदन सातार्डेकर, अभय कामुलकर, रघुवीर कोटकर, समीर कोरगावकर, मूर्तिकार अरुण पालयेकर, विजय पालयेकर, मूर्ती पुरस्कर्ते आनंद रेडकर, सुरेश तारी, आनंद सावळ देसाई, कृष्णा पालयेकर, संदेश सावळ देसाई, रवळनाथ वेर्णेकर, हृषिकेश सातार्डेकर, नवसो कशालकर, गुरु तारी, महेश देसाई, प्रकाश पालयेकर, विश्वास पालयेकर, आदी यावेळी उपस्थित होते.