Tarun Bharat

डिचोली तालुक्मयात पाच व सात दिवशीय गणेश मूर्तींचे विसर्जन

मेणकुरे, साळ भागात बहुतेक गणेश सात दिवशीय. तालुक्मयातील पाच दिवशीय गणेश चतुर्थी मोठय़ा उत्साहात संपन्न.

डिचोली/प्रतिनिधी

दिड दिवसांच्या बाप्पांना भावपूर्ण निरोप दिल्यानंतर पाच दिवशीय गणेशमूर्तींना मोठय़ा उत्साहात निरोप देण्यात आला. तर काल मंगळ. दि. 6 सप्टें. रोजी संध्याकाळी रात्री सात दिवशीय गणेशमूर्तींना मोठय़ा श्रध्देने निरोप देण्यात आला. तालुक्मयातील मेणकुरे, साळ या गावात बहुतेक गणपती हे सात दिवशीय असतात. त्यामुळे या गावांमध्ये विसर्जनाचा मोठा थाट पहायला मिळतो. तसेच इतरही ठिकाणी सात दिवशीय गणेश मूर्ती विसर्जनात मोठा उत्साह होता.

डिचोली तालुक्मयातील डिचोली व साखळी या शहरी भागातील बहुतेक लोकांची गणेश चतुर्थी हि दिड दिवशीय असते. या दिड दिवसांच्या गणेशांचे मोठय़ा थाटामाटात गेल्या गुरू. दि. 1 सप्टें. रोजी विसर्जन करण्यात आले होते. त्यानंतर पाच दिवशीय गणेशांचे रवि. दि. 4 सप्टें. रोजी विसर्जन झाले. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त लोकांची गणेश चतुर्थी पाच दिवसांची असल्याने एकाचवेळी सामुदायिक रित्या या गणेश मूर्तींचे विसर्जन केले जाते. हि परंपरा आजही ग्रामीण भागातील गावांमध्ये, वाडय़ांवर राखून ठेवण्यात आली आहे.

  याच प्रथेचे दर्शन याही वषी गावागावांत पहायला मिळाले. सर्वांचे एकत्रितपणे गणेश विसर्जनाला नेण्यात आले. एका ठिकाणी ते रांगेत ठेऊन नदी, तळीत विसर्जन करण्यात आले.

काल मंगळ. दि. 6 सप्टें. रोजी संध्याकाळी रात्री सात दिवशीय गणेश मूर्तींचे मोठय़ा थाटामाटात विसर्जन करण्यात आले. डिचोली तालुक्मयातील साळ, मेणकुरे या गावांमध्ये जास्तीत जास्त गणेश हे सात दिवशीयच असतात. मेणकुरे गावात तर पाच दिवशीय गणेश चतुर्थी असणारे घर क्वचितच सापडणार. या गावातील गणेश चतुर्थी हि सात दिवसांतून सुरू होते. त्यावर नऊ, अकरा दिवशीय गणेश चतुर्थी पहायला मिळते. तर साळ या गावात पाच दिवशीय आणि सात, नऊ, अकरा दिवशीय गणेश चतुर्थी पहायला मिळते.

या गावांप्रमाणेच काही गावांमध्ये काही घरांमध्ये वार्षिक सात दिवशीय गणेश चतुर्थी साजरी करणारी कुटूंबे आहेत. त्यांच्या गणरायाचे काल विसर्जन झाले. या विसर्जनाचाही थाट मोठाच होता. दि?डी मिरवणूक, आरती, फुगडय़ा, दारूकामाची आतषबाजीच्या गाजावाजात तसेच गणेशाच्या जयघोषात गणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

Related Stories

पराभवाचे खापर आपल्यावर, याचिकेवर फोडणे गैर

Omkar B

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांची पुण्यतिथी बलिदान दिवस म्हणून साजरी

Amit Kulkarni

राहुल गांधीनी प्रवास केला मोटरसायकल वरून

Patil_p

भाजपमध्ये होत होती प्रचंड घुसमट

Amit Kulkarni

लोकांना विश्वासात घेऊन फातोर्डात भरघोस विकासकामे

Amit Kulkarni

इथॅनला राष्ट्रीय रौप्य; विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धेत खेळण्याची मिळविली पात्रता

Amit Kulkarni