अनेकांचा व्यवसाय थंडावला, विव्रेत्यांना फटका : गजबजणाऱ्या बाजारपेठेत शुकशुकाट
बेळगाव : पंतप्रधान सोमवारी बेळगाव दौऱ्यावर होते. दरम्यान, जाहीरसभा आणि रोड शो झाला. त्यामुळे रस्त्यावर बॅरिकेड्स उभे करण्यात आले होते. परिणामी वाहतूक विस्कळीत झाली. शिवाय बाजारपेठवर याचा परिणाम झाला. एरवी ग्राहकांनी आणि नागरिकांनी गजबजणाऱ्या बाजारपेठेत शुकशुकाट दिसून आला. बॅरिकेड्स लावल्यामुळे नागरिकांना शहरात प्रवेश करता आला नाही. त्यामुळे बाजारपेठेत नागरिकांची वर्दळ थंडावली होती. पंतप्रधान दौऱ्याची तयारी सकाळपासूनच सुरू होती. त्यामुळे भाजी विव्रेते आणि इतर व्यावसायिकांना फटका बसला. विशेषत: काही नागरिकांनी शहराकडे येणे टाळले. पंतप्रधान दौऱ्यामुळे शहरात गर्दी होणार या उद्देशाने काहींनी घरीच राहणे पसंद केले. त्यामुळे बाजारपेठेत ग्राहकांचा प्रतिसाद थंडावला होता. व्यापारी, व्यावसायिकांनी नेहमीप्रमाणे दुकाने सुरू केली होती. मात्र, ग्राहकच नसल्याचे दिसून आले. चˆम्मा सर्कलपासून ते येडियुराप्पा मार्गापर्यंत रोड शो मार्गावर बॅरिकेड्स लावण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना शहरात प्रवेश करणे कठीण झाले होते. शिवाय मागील दोन दिवसांपासून दौऱ्याची तयारी सुरू होती.
उलाढालीवर परिणाम
पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे शहर आणि ग्रामीण भागातील बससेवाही ठप्प झाली होती. त्यामुळे ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची संख्या रोडावली होती. त्यामुळे बाजारपेठेच्या उलाढालीवर परिणाम झाला. बाजारपेठेतील किराणा आणि इतर दुकानदारांना ग्राहकांच्या प्रतीक्षेत बसावे लागले. शिवाय फूल विव्रेते, भाजीपाला विव्रेत्यांची देखील ग्राहकांकडून निराशा झाली. काही किरकोळ विव्रेत्यांना ग्राहकांविना घरी परतावे लागले. काही व्यावसायिकांनी दुकाने बंद करणे पसंद केले.