Tarun Bharat

भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांना महत्त्व : अमेरिका

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

भारत धोरणात्मकदृष्टय़ा हिंद-प्रशांत क्षेत्रात अमेरिकेचा ‘अत्यंत महत्त्वपूर्ण’ सामरिक भागीदार आहे. अमेरिका भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांना महत्त्व देत असल्याचे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. रशियासंबंधी प्रत्येक देशाला निर्णय घ्यायचा असल्याचे अमेरिकेच्या अध्यक्षीय कार्यालयाने नमूद केले आहे. व्हाईट हाऊस सुरक्षा परिषदेचे समन्वयक जॉन किर्बी यांनी पत्रकार परिषदेत भारतासंबंधी भूमिका मांडली आहे.

Advertisements

भारताच्या आर्थिक धोरणांबद्दल आम्ही तेथील नेत्यांला बोलू देणार आहोत. भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांना आम्ही महत्त्व देतो, एवढेच आम्ही सांगू शकतो. प्रत्येक देशाला स्वतःचे निर्णय घ्यावे लागतात, असे किर्बी यांनी रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चेतेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल बोलताना म्हटले आहे.

युक्रेनवरील आक्रमणाप्रकरणी रशियावर शक्य तितका दबाव आणला जावा, अशी अमेरिकेची इच्छा आहे. ब्लादिमीर पुतीन यांना त्यांच्या कृत्यांची शिक्षा व्हायला हवी, असे किर्बी यांनी सांगितले आहे. रशियाकडून युक्रेनवर आक्रमण करण्यात आल्यावर अनेक देशांनी रशियाच्या विरोधात कठोर निर्बंध लादले आहेत.

युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियावर भारताने उघडपणे टीका केलेली नाही. परंतु चर्चेद्वारे समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो, अशी भूमिका भारताने सातत्याने मांडली आहे. रशियाकडून कच्चेतेल खरेदी करण्याचा निर्णय देशाच्या इंधन गरजा लक्षात घेऊन घेण्यात आल्याचे भारताने म्हटले आहे.

Related Stories

इराणला अण्वस्त्रसज्ज होऊ देणार नाही!

Patil_p

एकाच कंपनीत 70 वर्षांपासून कार्यरत

Amit Kulkarni

1999 पासून बेपत्ता 8000 लोकांचा शोध घ्या

Patil_p

श्रीलंकेकडून भारताला मोठा झटका

Patil_p

तिसरा डोस देणारा पहिला देश ठरला इस्रायल

Patil_p

ज्यो बिडेन यांनी ड्रग टेस्ट करवून घ्यावी!

Patil_p
error: Content is protected !!