Tarun Bharat

भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांना महत्त्व ः अमेरिका

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

भारत धोरणात्मक दृष्टय़ा महत्त्वपूर्ण हिंद-प्रशांत क्षेत्रात अमेरिकेचा ‘अत्यंत महत्त्वपूर्ण’ सामरिक भागीदार आहे. अमेरिका भारतासोबतच्या द्विपक्षीय संबंधांना महत्त्व देत असल्याचे व्हाइट हाउसने म्हटले आहे. रशियासंबंधी प्रत्येक देशाला निर्णय घ्यायचा असल्याचे अमेरिकेच्या अध्यक्षीय कार्यालयाने नमूद केले आहे. व्हाइट हाउस सुरक्षा परिषदेचे समन्वयक जॉन किर्बी यांनी पत्रकार परिषदेत भारतासंबंधी भूमिका मांडली आहे.

Advertisements

भारताच्या आर्थिक धोरणांबद्दल आम्ही तेथील नेत्यांला बोलू देणार आहोत. भारतासोबतच्या या द्विपक्षीय संबंधांना आम्ही महत्त्व देतो एवढेच आम्ही सांगू शकतो. प्रत्केक देशाला स्वतःचे निर्णय घ्यावे लागतात असे किर्बी यांनी रशियाकडून सवलतीच्या दरात कच्चे तेल खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल बोलताना म्हटले आहे.

युक्रेनवरील आक्रमणाप्रकण्री रशियावर शक्य तितका दबाव आणला जावा अशी अमेरिकेची इच्छा आहे. ब्लादिमीर पुतीन यांना त्यांच्या कृत्यांची शिक्षा व्हायला हवी असे किर्बी यांनी सांगितले आहे. रशियाकडून युक्रेनवर आक्रमण करण्यात आल्यावर अनेक देशांनी रशियाच्या विरोधात कठोर निर्बंध लादले आहेत. युक्रेनवरील आक्रमणानंतर रशियावर भारताने उघडपणे टीका केलेली नाही. परंतु चर्चेद्वारे समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो अशी भूमिका भारताने सातत्याने मांडली आहे. रशियाकडून कच्चे तेल खरेदी करण्याचा निर्णय देशाच्या इंधन गरजा लक्षात घेऊन घेण्यात आल्याचे भारताने म्हटले आहे.

Related Stories

विश्वचषकातील पदक हे माझे पुढील लक्ष्य

Patil_p

कर्नाटक : राज्यात संक्रांतीनंतर पीजी, यूजीचे ऑफलाइन वर्ग सुरु

Abhijeet Shinde

विद्यादान हे अन्नदान, नेत्रदान, देहदान, धनदानादिकांहून सर्वश्रेष्ठ दान आहे

Rohan_P

काश्मीरमधील अनोखे ‘बडा घर’

Patil_p

‘इफ्फी’त पुढील वर्षी खासगी क्षेत्रालाही स्थान

Abhijeet Shinde

सरकारी रुग्णालयातच उपचार घ्या; अनिल देशमुखांना न्यायालयाचा झटका

datta jadhav
error: Content is protected !!