Tarun Bharat

सर्वच क्षेत्रांमध्ये गणिताला महत्त्व

डॉ. मंदाकिनी मुचंडी यांचे प्रतिपादन : गणित विषयावर मार्गदर्शन

प्रतिनिधी /बेळगाव

आजच्या युगात प्रत्येक विद्याशाखेत गणित हा मूलभूत विषय आहे. कॉम्प्युटर सायन्स, मेकॅनिकल, इंजिनिअरिंग, मेडिकल या सर्व क्षेत्रात गणित महत्त्वाचे आहे. केवळ अभ्यासात नव्हे तर व्यावहारिक जगामध्ये गणिताला सर्वोच्च स्थान आहे. त्यामुळे गणिताला सर्व विषयाची राणी म्हणतात, असे प्रतिपादन प्रा. डॉ. मंदाकिनी मुचंडी यांनी केले.

मराठा जागृती निर्माण संघातर्फे हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिरात गणित विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. वर्षा बिर्जे, विद्या तोपिनकट्टी, सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, मराठा जागृती निर्माण संघाचे अध्यक्ष गोपाळ बिर्जे यांच्या हस्ते डॉ. मंदाकिनी यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी ऍड. आप्पासाहेब देसूरकर, सीमा मुचंडी, निरंजन मुचंडी, पी. जे. घाडी, नारायण अंब्रोळकर, संदीप मोरे, मिनीप्रसाद देसूरकर, प्रमोद धामणेकर, विजय येळ्ळूरकर, महेश बाळेकुंद्री यासह इतर उपस्थित होते. जयदीप बिर्जे यांनी प्रास्ताविक केले. सोनाली बिर्जे यांनी सूत्रसंचालन केले. तर वीणा तोपिनकट्टी यांनी आभार मानले.

Related Stories

जिल्हय़ातून 78,587 विद्यार्थी देणार दहावीची परीक्षा

Patil_p

आणखी 18 भूमिगत कचराकुंडय़ांची खरेदी

Amit Kulkarni

विद्यार्थ्यांना संगणक शिक्षणाची गरज

Amit Kulkarni

लव्ह जिहाद विरोधी पोलीस पथकाची स्थापना करा

Amit Kulkarni

ख्रिस्ती बांधवांवरील खोटे आरोप थांबवा

Amit Kulkarni

ऑनलाईन फसवणुकीचे प्रकार सुरूच

Amit Kulkarni