तिघांकडे सापडली घातक शस्त्र : 26 ठिकाणी कारवाई
प्रतिनिधी /बेळगाव
काळय़ा यादीतील 26 गुन्हेगारांच्या घरांवर बुधवारी सकाळी पोलिसांनी छापे टाकले. या कारवाईत रुक्मिणीनगर, महाद्वार रोड, खंजर गल्ली परिसरात तलवार, जांबिया, मुष्टी, चाकू आदी शस्त्रs जप्त करण्यात आली आहेत.
पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई झाली आहे. प्रत्येक पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात राहणाऱया काळय़ा यादीतील गुन्हेगारांची यादी बनविण्यात आली होती. यापैकी अनेकांनी आपल्या घरात घातक शस्त्रs ठेवल्याच्या संशयाने तपासणी करण्यात आली. तपासणीअंती तिघा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मार्केट व माळमारुती पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात शस्त्रs आढळली आहेत. रुक्मिणीनगर येथील श्रीधर तळवार (वय 29), महाद्वार रोड येथील विनायक प्रधान (वय 45), खंजर गल्ली येथील अल्ताफ सुभेदार (वय 36) यांच्याकडे शस्त्रs आढळल्याची माहिती मिळाली आहे.
कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी
या कारवाईत 150 हून अधिक अधिकारी व पोलिसांनी भाग घेतला. काळय़ा यादीतील गुन्हेगारांची यादी बनवून सर्च वॉरंट घेऊन तपासणी करण्यात आली असून या कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये धडकी भरली आहे. शहरातील बहुतेक पोलीस अधिकारी बुधवारी सकाळी या छापेमारीत सहभागी झाले होते.