Tarun Bharat

नव्या पेन्शन योजनेत सुधारणा

सेवा कालावधीत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास  कुटुंबीयांना मिळणार निवृत्ती वेतन 

प्रतिनिधी/ मुंबई

 राज्यात सुरू असलेल्या राज्य शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. सेवा कालावधीत कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्ती वेतन मिळणार आहे. याआधी हे निवृत्ती वेतन दिले जात नव्हते. त्याशिवाय, मंत्रिमंडळ बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

शासकीय कर्मचाऱ्यांच्या नव्या पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच कोतवालांच्या मानधनात वाढ आणि आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात वाढ करण्यास मान्यता देण्यात आली आहे.  राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी राज्यातील जवळपास 18 लाख कर्मचारी संपावर गेले आहेत. यामुळे राज्यातील शासकीय कामकाज विस्कळीत झाले आहे. आरोग्यव्यवस्था कोलमडली असून शैक्षणिक क्षेत्रातील कर्मचारी संपावर गेल्याने शाळांना टाळे लागले आहेत. तर, दुसरीकडे विविध शासकीय कामेही रखडली आहे. यामुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसला आहे. सरकार जुनी पेन्शन योजना लागू करत नाही तोवर संप मिटवणार नसल्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

निवडणुकीच्या तोंडावर कर्मचारी संपावर

निवडणुकीच्या तोंडावर तब्बल 18 लाख सरकारी कर्मचारी संपावर गेल्याने शिंदे-फडणवीस सरकारने एक पाऊल मागे घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळेच नवीन पेन्शन योजनेत सुधारणा करण्याचा मोठा निर्णय घेतल्याचे समजते.

दरम्यान, जुनी पेन्शन योजना लागू करण्याकरता समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर जुन्या पेन्शन योजनेबाबत निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागफहात दिले होते. त्यानंतरही संपकऱ्यांनी संप मागे न घेतल्याने अनेक जिह्यातील सरकारी कर्मचाऱ्यांविरोधात कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

काय असणार बदल

नवीन पेन्शन योजनेमध्ये सुधारणा करीत शासकीय कर्मचाऱ्यांना निवफत्तीपश्चात सेवा उपदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सेवा कालावधीत कर्मचाऱ्यांचा मफत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना कुटुंब निवफत्ती वेतन आणि मफत्यू उपदान मिळणार आहे. 2005 पासून ते आजपर्यंत म्हणजेच मागील 17 वर्षांत 2500 कर्मचाऱ्यांचा मफत्यू झाला आहे. मात्र, त्यांच्या कुटुंबियांना कुटुंब-निवफत्ती वेतन मिळत नव्हते. आता कर्मचाऱ्याचा मफत्यू झाल्यास मफत्यू उपदान मिळणार आहे. या आधी 10 लाखांचे सानुग्रह अनुदान मिळत होते. त्यात आता बदल करण्यात आला आहे. तर, निवफत्त झाल्यानंतर शासकीय कर्मचाऱ्यांना सेवा उपदानही मिळणार आहे.नवीन पेन्शनधारकांना या योजनांचा लाभ देण्याचा  निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला आहे.

Related Stories

चिमणपुऱयातला पॉझिटीव्ह युवक फिरतोय गरगरा

Patil_p

न्यायपालिकेत महिलांची हिस्सेदारी वाढविण्यात यावी

Patil_p

देवबंदमध्ये एटीएस कमांडो सेंटरची स्थापना होणार

Amit Kulkarni

शेतकरी ‘आत्मनिर्भर भारता’चा आधार

datta jadhav

ओडिशा सरकारने 30 एप्रिल पर्यंत वाढवला लॉक डाऊनचा कालावधी

prashant_c

14 वर्षांनी वाढणार ‘काडेपेटी’चे दर

Patil_p