Tarun Bharat

इम्रान खान यांना अंतरिम जामीन

न्यायाधीश-पोलिसांना धमकाविण्याचा प्रकार

वृत्तसंस्था /इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना दहशतवादाशी संबंधित नोंद गुन्हय़ाप्रकरणी 1 सप्टेंबरपर्यंत अंतरिम जामीन मिळाला आहे. एका जाहीर सभेत महिला न्यायाधीश अन् पोलीस अधिकाऱयांना धमकी दिल्याप्रकरणी खान यांच्या विरोधात दहशतवादाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. 21 ऑगट रोजी दहशतवादविरोधी कायद्याच्या अंतर्गत वॉरंट जारी करण्यात आले होते.

वॉरंट बजावण्यात येताच इम्रान यांच्या पक्षाने इस्लामाबाद उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. यापूर्वी 24 ऑगस्टपर्यंत त्यांच्या अटकेला स्थगिती दिली होती. पाकिस्तानचे पोलीस कुणाच्या तरी निर्देशावर माझ्या पक्षाच्या नेत्यांना अटक करत आहेत असे म्हणत इम्रान यांनी एका महिला न्यायाधीशाला धमकी दिली होती. न्यायाधीशांनी परिणामांना सामोरे जाण्यासाठी तयार रहावे असे त्यांनी म्हटले होते.

Related Stories

डोनाल्ड ट्रम्प, मेलानिया यांना कोरोनाची बाधा

datta jadhav

इंडोनेशिया, मलेशियाकडून निर्बंधात सवलत देण्याची तयारी

Patil_p

न्यूझीलंड : जेसिंडा आर्डर्न यांनी रचला इतिहास

Patil_p

मलेशियाच्या पंतप्रधानपदी इस्माइल सब्री याकोब यांची निवड

Patil_p

ऑर्डर घेतल्यावर विसरतात वेटर

Patil_p

एलन मस्कने जिंकली मनं

Patil_p