Tarun Bharat

इम्रान खान यांच्याकडून पुन्हा मोदींचे कौतुक

Advertisements

मोदींची विदेशात कुठलीच मालमत्ता नाही : भारत स्वाभिमानी देश

वृत्तसंस्था /इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. नरेंद्र मोदींची देशाबाहेर कुठलीच मालमत्ता नाही, परंतु पाकिस्तानातील नेत्यांची अन्य देशांमध्ये कोटय़वधींची मालमत्ता असल्याचे इम्रान यांनी एका भाषणादरम्यान म्हटले आहे. शाहबाज शरीफ यांचे विदेशात अब्जावधी रुपयांची मालमत्ता अन् कोटय़वधींचा व्यवसाय असल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकशाही असलेल्या देशातील पंतप्रधानांची अब्जावधींची मालमत्ता विदेशात असल्याचे पाकिस्तान वगळता एक उदाहरण दाखवून द्या.पाकिस्तानात सामर्थ्यशालींसाठी वेगळा कायदा आणि दुर्बलांसाठी वेगळा कायदा असल्यानेच हा प्रकार घडत असल्याचे इम्रान यांनी म्हटले आहे.

भारत आणि पाकिस्तान एकाचवेळी स्वतंत्र झाले, परंतु भारत आता पाकिस्तानपेक्षा खूपच आघाडीवर आहे. भारत हा एक स्वाभिमानी देश आहे. भारताला स्वतःच्या इशाऱयांवर नाचविण्याची शक्ती कुठल्याही महासत्तेकडे नाही. कुठलाही देश भारताकडे डोळे वटारून पाहू शकत नसल्याचे इम्रान यांनी यापूर्वी म्हटले होते.

Related Stories

जगभरात बाधितांच्या संख्येने ओलांडला 7 कोटींचा आकडा

datta jadhav

घर नव्हे तर मिनी प्राणिसंग्रहालय

Patil_p

कामावर नव्हता तरीही 15 वर्षांपासून वेतन

Patil_p

सीमेने विभागले, झोपाळय़ांनी जोडले

Patil_p

इस्रायल : सरकार कठोर

Patil_p

भारताचा गरीबी आणि असमानता असलेल्या देशात समावेश

Sumit Tambekar
error: Content is protected !!