Tarun Bharat

इम्रान खान यांनी भारताच्या ‘या’ निर्णयाचं केलं कौतुक

ऑनलाईन टीम/तरुण भारत

केंद्र सरकारने (modi government) इंधनावरील उत्पादन शुल्कात कपात केल्यानंतर शनिवारी पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर ९.५ रुपये आणि डिझेलच्या दरात ७ रुपयांनी कपात करण्यात आली. भारताच्या या निर्णयाचे पाकिस्तानचे (pakistan) पंतप्रधान इम्रान खान (imran khan) यांनी कौतुक केले आहे.

अमेरिकेच्या (america) दबावाला न जुमानता रशियाकडून (Russia) अनुदानित तेल खरेदी केल्याबद्दल पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी पुन्हा एकदा भारताचे कौतुक केले आहे. भारत सरकार (india government) स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने हे साध्य करण्यासाठी काम करत आहे, असे इम्रान खान म्हणाले. त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) नेतृत्वाखालील सरकारची डोके नसलेल्या कोंबड्यासारखी अर्थव्यवस्था अशी टीका केली. इंधन दरात कपात करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाची माहिती शेअर करताना, इम्रान खान यांनी ट्विट केले आहे. “भारताने स्वतःला अमेरिकेच्या दबावापासून अलिप्त ठेवले आणि जनतेला दिलासा देण्यासाठी अनुदानित रशियन तेल खरेदी केले. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने आमचे सरकार जे साध्य करण्यासाठी काम करत होते ते भारताने केले,” असे इम्रान खान म्हणाले. त्यांनी पाकिस्तान मुस्लिम लीग (एन) नेतृत्वाखालील सरकारची डोके नसलेल्या कोंबड्यासारखी अर्थव्यवस्था अशी टीका केली. आणि मोदी सरकारने काल केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करण्याच्या घोषणेचे त्यांनी कौतुक केले.

इंधन दरात कपात करण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाची माहिती शेअर करताना, पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफचे (पीटीआय) नेते इम्रान खान यांनी ट्विटरवर याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. “क्वाडचा एक भाग असूनही, भारताने स्वतःला अमेरिकेच्या दबावापासून अलिप्त ठेवले आणि जनतेला दिलासा देण्यासाठी अनुदानित रशियन तेल खरेदी केले. स्वतंत्र परराष्ट्र धोरणाच्या मदतीने आमचे सरकार जे साध्य करण्यासाठी काम करत होते ते भारताने केले,” असे इम्रान खान म्हणाले.

Advertisements

Related Stories

भारत-ब्रिटन विमानसेवेचा बुधवारपासून पुनश्च हरि ओम

datta jadhav

लाल किल्ला हिंसाचार प्रकरणातील मुख्य आरोपी अटकेत

datta jadhav

गुणामध्ये युवा स्वयंसेवक शिबिर

Patil_p

तामिळनाडू : एम के स्टॅलिन यांनी घेतली मुख्यमंत्री पदाची शपथ!

Rohan_P

‘पेगॅसस’प्रकरणी चौकशी समिती स्थापन

Patil_p

कर्नाटक राज्यात अंतिम वर्षाची परीक्षा वगळता कॉलेजच्या सर्व विषयाचा परीक्षा रद्द

Rohan_P
error: Content is protected !!