Tarun Bharat

इम्रान खान यांच्या निकटवर्तीयाला अटक

Advertisements

कारच्या काचा फोडून घेतले ताब्यात

वृत्तसंस्था/ इस्लामाबाद

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सैन्याची नाराजी ओढवून घेणे महागात पडू लागले आहे. इम्रान यांचे निकटवर्तीय आणि माजी चीफ ऑफ स्टाफ शाहबाज गिल यांना अटक करण्यात आली आहे. गिल यांनी एका टीव्ही शोमध्ये पाकिस्तानी सैन्याला विश्वासघाती संबोधिले होते. अटकेवेळी गिल हे आलिशान कारमधून इम्रान यांच्या निवासस्थानाच्या दिशेने जात होते. कार न थांबविल्याने वाहनाच्या काचा फोडून गिल यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. इम्रान यांना आता कुठल्याही क्षणी अटक केली जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

शाहबाज गिल हे पाकिस्तानसह अमेरिकेचेही नागरिक आहेत. पाकिस्तानी सैन्य आणि न्यायप्रणालीवर गिल यांनी सडकून टीका केली होती. यामुळे पाकिस्तानचे सैन्य अत्यंत नाराज झाले होते. गुप्तचर यंत्रणा शाहबाज यांची कसून चौकशी करत असल्याचे मानले जात आहे. इम्रान यांचे समर्थक पत्रकार इम्रान रियाज खान यांनाही अटक करण्यात आली आहे. ते एआरवाय वृत्तवाहिनीत कार्यरत होते. या वाहिनीचे काही शहरांमधील प्रसारण रोखण्यात आले आहे.

Related Stories

हिनामनोर चक्रीवादळ जपानला धडकणार

Patil_p

तान्हुल्या मुलीच्या पाठीवर लिहिले नाव अन् संपर्क क्रमांक

Patil_p

उत्तर कोरियाकडून क्षेपणास्त्र चाचणी

Patil_p

फ्रान्सचा मालीमध्ये एअर स्ट्राईक; 50 दहशतवाद्यांचा खात्मा

datta jadhav

C-17 विमानाच्या चाकांवर मानवी मृतदेहाचे अवशेष

datta jadhav

चीनच्या ‘बीआरआय’वर मात करणार जी-7

Patil_p
error: Content is protected !!