Tarun Bharat

उध्दव ठाकरेंच्या संबोधनाचं इम्तियाज जलील यांनी केले कौतुक

Advertisements

ऑनलाईन टीम/ तरुण भारत

उध्दव ठाकरेंचा प्रामाणिकपणा दिसत होता. नम्रतेने ठाकरेनी विरोधकांना चपराक दिली. उध्दव ठाकरेंबद्दल आदर वाढला आहे, असे ट्विट करत इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी उध्दव ठाकरेंच्या संबोधनाचं कौतुक केलं. यावेळी त्य़ांनी माध्यमांशी ही संवाद साधला.

ते म्हणाले, महाराष्ट्रातील राजकारणात आमदारांना अशा पध्दतीने हाॅटेलमध्ये ठेवणे हे पहिल्यांदाच झालं आहे. ही महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. पण आज ज्या पध्दतीने मुख्यमंत्र्यांनी (Uddhav Thackeray) अतिशय नम्रपणे जे संबोधन केले हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती आहे. कोणत्याही पदावर मी नव्हतो तरीही मी जबाबदारीने हे पद सांभाळण्याचा प्रयत्न केला. मला समोर येऊन सांगा मी पद सोडतो असे ठामपणे ते बोलले. याचे खूप कौतुक आहे असे ते म्हणाले.

काय म्हणाले ट्विटमध्ये इम्तियाज जलील

शिवसेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असू शकतात. पण आज उध्दव ठाकरेंना एेकल्यावर माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणखीन वाढला. तुमच्या नम्रतेनं सर्व विरोधकांना जोरदार चपराक दिली असे ट्विट त्यांनी केलं.

Related Stories

सुप्रीम कोर्टाने धर्म संसदेतील द्वेषपूर्ण भाषणांबद्दल मागितला अहवाल

Abhijeet Shinde

महाराष्ट्रात 3,365 नवे कोरोनाबाधित; 23 मृत्यू

Rohan_P

एच. के. पाटील काय म्हणतात त्यालाच आम्ही महत्व देतो; प्रफुल्ल पटेलांचा पटोलेंना टोला

Abhijeet Shinde

दानवेंविरोधात बंड, ब्रेकफास्ट ते तलवार म्यान?

datta jadhav

“…अन्यथा कोकणवासीय ‘कोल्हापुरी चप्पल’ हातात घेऊन नवाब भाईंचं स्वागत करतील..!”

Abhijeet Shinde

पुणे विभागातील 6 लाख 10 हजार 992 रुग्ण कोरोनामुक्त!

Rohan_P
error: Content is protected !!