कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे निर्णय
जेद्दाह / वृत्तसंस्था
कोविड-19 चा पुन्हा उदेक आणि गेल्या काही आठवडय़ांपासून दररोज कोविड संसर्गाच्या संख्येत वेगाने वाढ होत असल्याने सौदी अरेबियाने आपल्या नागरिकांना भारतासह सोळा देशांमध्ये प्रवास करण्यास बंदी घातली आहे. सौदी अरेबियाच्या नागरिकांना भारताव्यतिरिक्त प्रवास करण्यास बंदी असलेल्या सोळा देशांमध्ये लेबनॉन, सीरिया, तुर्कस्तान, इराण, अफगाणिस्तान, येमेन, सोमालिया, इथिओपिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, लिबिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, आर्मेनिया, बेलारुस आणि व्हेनेझुएला आदी देशांचा समावेश आहे. सौदी अरेबियात आतापयर्यंत मंकीपॉक्सचे रुग्ण सापडलेले नाहीत. मात्र, जगभरात बऱयाच देशांमध्ये कोरोना आणि मंकीपॉक्सचे रुग्ण वाढत असल्याने प्रवासबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचे सौदीच्या आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.