आचरा/ प्रतिनिधी-
गेले दोन दिवस सुटलेला वादळी वारा व सततत्याने पडत असलेल्या पावसाचा फटका आचरा भंडारवाडी येथील मधुकर यशवंत मुणगेकर यांच्या राहत्या घराला बसला. त्यांच्या घराच्या पडवीवर घरापासून काही अंतरावर असलेला माड कोसळ्याने छप्पराचे नुकसान झाले आहे. ही घटना सोमवारी पहाटे 5.30 वाजता घडली. माड पडवीवर कोसळून सुमारे 25 हजाराचे नुकसान झाले.
मुणगेकर यांच्या पडवीवर माड कोसळला तेव्हा घरातील माणसे घराच्या पुढच्या भागात झोपलेली असल्याने मोठा अनर्थ टळला. माड कोसळल्याने घराचे वासे, कौले रिपा, पत्रे असे मिळून सुमारे 25 हजाराचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळाल्यावर आचरा माजी सरपंच मंगेश टेमकर, तलाठी अनिल काळे पोलीस पाटील विठ्ठल धुरी, कोतवाल गिरीश घाडी यांनी घराची पाहणी करून झालेल्या नुकसानीची पंचायादी घालून माहिती महसूल विभागाला कळविली.