वृत्तसंस्था/ बेंगळूर
बांधकाम क्षेत्रातील कंपनी इमामी ग्रुपने आर्थिक 2023 मध्ये आपल्या घर विक्रीमध्ये 50 टक्के वाढीचे उद्दिष्ट ठेवले आहे. सदरच्या आर्थिक वर्षामध्ये घर विक्रीतून 750 कोटी रुपये मिळविण्याचा इरादा कंपनीने व्यक्त केला आहे.
सध्याला आर्थिक परिस्थिती कमकुवत असली तरी घरांची मागणी ही तेजीतच राहणार असल्याचा विश्वास कंपनीने वर्तविला आहे. कंपनीवर सध्या 118 कोटीचे कर्ज डोक्यावर आहे. कंपनीकडे देशातील 7 ते 8 शहरांमध्ये 2500 एकरची जागा आहे. याअंतर्गत येत्या काही वर्षांमध्ये नव्या प्रकल्पांची उभारणी करून वरील प्रमाणे उद्दिष्ट साध्य करण्याचे नियोजन कंपनीने केल्याचे समजते. आर्थिक 2022 मध्ये 500 कोटी रुपयांचा व्यवसाय घर विक्रीतून केला होता. आर्थिक 2023 साठी 750 कोटीचे लक्ष ठेवण्यात आले आहे.