एनआयए’चे छापासत्र शनिवारी दिवसभर विविध भागात शोधमोहीम
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्ली-एनसीआरमध्ये दहशतवादी संघटना आयएसआयएस आणि या संघटनेशी संबंधित त्याच्या अनेक संशयित समर्थकांविरोधात मोठी कारवाई केली आहे. त्यांच्या शोधासाठी अनेक ठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. पुण्याशी संबंधित तीन संशयित दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांच्या पथकाने एनआयए तपास यंत्रणेशी संपर्क साधला होता. त्या अनुषंगाने तीन प्रमुख संशयित दहशतवाद्यांनी दिल्ली-एनसीआरमध्ये आश्रय घेतल्याचा दावा केला जात होता.
आयएसआयएस दहशतवाद्यांच्या शोधासाठी एनआयए अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलिसांसह संयुक्त शोधमोहीम राबविण्यात आली. या कारवाईदरम्यान अत्यंत महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले. मात्र, शनिवारी सायंकाळी उशिरापर्यंत एनआयएने या प्रकरणाची कोणतीही अधिकृत माहिती दिली नव्हती. मोहम्मद शाहनवाज आलम उर्फ शफी उज्जामा उर्फ अब्दुल्ला, रिझवान अब्दुल हाजी अली, अब्दुल्ला फयाज शेख अशी तीन दहशतवाद्यांची नावे असून त्यांच्यावर इनामही जारी करण्यात आलेले आहे. एनआयएने तीन संशयित दहशतवाद्यांवर तीन लाख ऊपयांचे बक्षीस ठेवले आहे.
लवकरच आरोपींची छायाचित्रेही अधिकृतपणे जाहीर केली जातील, असे तपास यंत्रणेतील सूत्रांचे म्हणणे आहे. या तीन दहशतवाद्यांनी पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये संपर्कयंत्रणा तयार केली आहे. त्यांचे साथीदार अनेक शहरांमध्ये सक्रिय असून देशविरोधी कारवाया करण्यासाठी आणि दहशतवादी कृत्ये करण्यासाठी तऊणांना त्यांच्या दहशतवादी संघटनेत सामील करून घेण्यासाठी अतिशय आधुनिक पद्धतीने काम करत होते. यासोबतच अनेक तऊणांचे ब्र्रेनवॉश करून त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी करून घेतले जात होते.