Tarun Bharat

अन ‘त्या’ बंडखोर ३५ आमदारांचा फोटो समोर, मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढलं

सुरत: इतिहासात पहिल्यांदाच शिवसेनेत इतकी मोठी बंडाळी माजली आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी शिवसेनेतुन (shivsena) बंड पुकारून भाजपसोबत चला असा सूर दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व सरकार अडचणीत आले आहे. तब्बल २४ तास उलटून गेल्यानंतर एकनाथ शिंदे ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीत. असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे टेन्शन आणखी वाढलं आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांच्या संपूर्ण गटाचा फोटो समोर आला आहे. या फोटोत ३५ आमदारांचा गट दिसत असून थेट शिवसेनेला आव्हान देणारा फोटो व्हायरल करण्यात आलाय.

समर्थक आमदारांचा फोटो प्रसिद्ध

काल मध्यरात्री विधानपरिषदेचा निकाल जाहीर झाला आणि राज्यसभेप्रमाणे यातही भाजप आपले सर्व उमेदवार निवडून आणण्यात यशस्वी झाले. या भूकंपातून मविआ बाहेर येण्यापूर्वीच शिवसेनेचे नाराज नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला झटका दिला. एकनाथ शिंदे यांनी १९ आमदारांसह थेट गुजरात गाठलं आहे. त्यामुळे शिवसेनेत फूट पडल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला नॉट रिचेबल झाल्याने शिवसेनेची धाकधूक वाढली आहे, तर तिकडे गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांची भेट घेतली आहे. शिवसेनेला मोठा धक्का बसणार असं चित्र सध्या दिसतंय.

त्या फोटोत पहिल्या रांगेत बच्चू कडू

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडात अपक्ष आमदारांचा देखील समावेश आहे. आज मध्यरात्री शिंदे गटाने फोटो व्हायरल केला असून त्यात ३५ आमदार असल्याचे दिसून येत आहे. शिवाय प्रहार संघटनेचे आणि राज्यकृषीमंत्री बच्चू कडू देखील पहिल्या रांगेत उपस्थित आहेत.

Related Stories

नाकिंदा गावामध्ये मानवी वस्तीत बिबटय़ाचा वावर

Patil_p

8000633872 वरुन आलेल्या व्हॉट्स ॲप संदेशावर विश्वास ठेवू नये- जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांचे आवाहन

Anuja Kudatarkar

खाणीत मृतदेह सापडलेल्या ‘त्या’ युवकाचा खूनच

Patil_p

सातारा : लोणंदच्या बाजार समितीत ‘गरवा कांद्या’ला उच्चांकी दर !

Archana Banage

महाराष्ट्रात 5,229 नवे कोरोनाबाधित रुग्ण

Tousif Mujawar

आता ही तर सुरुवात आहे…जामीन मंजूर झाल्यानंतर आ. जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया

Abhijeet Khandekar