प्रतिनिधी / वास्को
केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांचे काल गुरूवारी दाबोळीतील आयएनएस हंस तळावर आगमन झाले. विमानतळावरून ते थेट नौदलाच्या कारवार तळाकडे रवाना झाले. दाबोळी विमानतळावर शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले.
याप्रसंगी भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी रिअर ऍडमिरल विक्रम मेनन व इतर नौदल व शासकीय अधिकारी उपस्थित होते. संरक्षणमंत्री राजनाथ सिंग दोन दिवसांच्या दौऱयावर आलेले असून ते कारवारच्या सी बर्ड नौदल तळावर तसेच कोची नौदल तळावरील नौदल अधिकारी व कर्मचाऱयांशी संवाद साधणार आहेत.