Tarun Bharat

जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईकचा डोळा १ कोटीवर, जमिनीच्या दाव्याचा निकाल लावण्यासाठी लाचेची मागणी

Advertisements

anticorreption- कोल्हापुरात आज लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईमुळे जिल्हा पोलीस मुख्यालय चर्चेत आले आहे. पोलीस नाईकांची करामत पाहून तुम्ही सुद्धा आश्चर्य व्यक्त कराल. शेत जमिनीच्या दाव्याचा निकाल बाजूने लावण्यासाठी जिल्हा पोलीस मुख्यालयातील पोलीस नाईकाने तब्बल १ कोटी रुपयांची लाच मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. लाच मागणारा पोलीस नाईक जिल्हाधिकाऱयांचा माजी सुरक्षा रक्षक होता. अशी माहिती समोर आली आहे. जॉन वसंत तिवडे असे त्याचे नाव असून त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की , तक्रारदार हे पुणे येथील रहिवासी असून त्यांच्या देहू येथील जमिनीचा खटला महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यामध्ये तक्रारदारस अनोळखी नंबर वरून फोन आला. यावेळी फोन करणाऱ्या व्यक्तीने तुमच्याकडे महत्वाचे काम आहे, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन भेटण्यास सांगितले. या नुसार तक्रार दाराने २५ फेब्रुवारी रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन संबंधित इसमाचा भेट घेतली. त्यावेळी तो इसम पोलीस असल्याचे दिसून आले. त्याने आपले नाव जॉन तीवडे असल्याचे सांगून मी जिल्हाधिकाऱ्यांचा सुरक्षा रक्षक असल्याचे सांगीतले. तुमच्या दाव्यातील विरोधी पार्टीने दाव्याचा निकाल त्यांच्या बाजूने लावण्यासाठी १ कोटी रुपयांची ऑफर दिली आहे. तुम्ही किती देणार? अशी थेट विचारणा केली. यामुळे गोंधळलेल्या तक्रारदाराने नंतर येऊन भेटतो असे सांगितले. तक्रादाराने याबाबत लाच लुचपत विभागाकडे या बाबतची तक्रार केली. या नुसार २२ मार्च रोजी मध्यवर्ती बस स्थानक परिसरात सापळा रचण्यात आला. या वेळी जॉन तावडे याने १ कोटी रुपये मागितल्याचे सिद्ध झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.लाच लुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोना विकास माने, सुनील घोसाळकर, पोकॉ मयूर देसाई, रुपेश माने यांनी ही कारवाई केली.

Related Stories

ॲड. गुणरत्न सदावर्तेही करणार अयोध्या दौरा

datta jadhav

इचलकरंजीतील कुख्यात विक्या मन्या गँगविरोधी डब्बल मोका

Abhijeet Shinde

महापालिका क्षेत्र पंचतारांकित घरे अभियान

Abhijeet Shinde

आ मकरंद पाटील यांच्या प्रयत्नांना यश

Patil_p

दहावी, बारावी परिक्षेची सर्व तयारी पूर्ण

Abhijeet Shinde

सांगली : उमदीत ओढा पात्रात बुडून दोघी बहिणींचा मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!