Tarun Bharat

कोल्हापुरात बनावट चावीच्या सहाय्याने 40 तोळे सोन्यावर डल्ला

कोल्हापूर- बनावट चावीच्या सहाय्याने सराफ दुकानातील ४० तोळे सोन्याचे दागिन्यांवर चोरटय़ांनी डल्ला मारला. टाकाळा येथील रणजीत एंटरप्रायझेस या दुकानात रविवारी रात्री १० ते सोमवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. याबाबतची फिर्याद रणजीत शांतीलाल पारेख (वय ४५ रा. सरलष्कर भवन जोतिबा रोड) यांनी याबाबतची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिली.

याबाबत अधीक माहिती अशी की, टाकाळा येथील माउली विहार अपार्टमेंटमध्ये रणजीत पारेख यांचे रणजीत एंटरप्रायझेस नावाचे सोन्या – चांदीचे दोन मजली सराफ दुकान आहे. पहिल्या मजल्यावर दागिन्यांचे शोरुम तर दुसऱया मजल्यावर ऑफीस आहे. रविवारी रात्री नेहमीप्रमाणे रणजीत पारेख दुकान बंद करुन घरी गेले होते. दुकान बंद करण्यापूर्वी त्यांनी दुकानातील सर्व दागिने दुकानाच्या ऑफीसमधील लॉकरमध्ये ठेवले होते. सोमवारी रणजीत व त्यांचा पुतण्या सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास दुकान उघडण्यासाठी गेले. दुकान उघडून आतमध्ये गेले असता त्यांना दुकानातील सिसीटीव्ही आणि, सिसिटीव्हीचा डिव्हीआरही कनेक्शन तोडून नेल्याचे दिसून आले. यानंतर पारेख यांनी दुकानाच्या पहिल्या मजल्यावर लॉकरकडे जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांना दुकानाच्या पहिल्यामजल्यावरील काचेचा दरवाजाही तोडल्याचे निदर्शनास आले. तसेच दागिन्यांचा लॉकरही उघडा असल्याचे दिसून आले. यामुळे दुकानात चोरी झाली असल्याचे त्यांना समजले. त्यांनी या घटनेची माहिती शाहूपुरी पोलासांना दिली. शाहूपुरी पोलिसांचे एक पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.
घटनास्थळी अधीकाऱयांचा फौजफाटा

४० तोळे दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहिती शहरात वाऱयासारखी पसरली. यानंतर शाहूपुरी पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, पोलीस निरीक्षक राजेश गवळी, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच घटनास्थळी श्वान पथकास आणि ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते.

७ बनावट चाव्यांचा वापर
रणजीत एंटरप्रायझेस येथे झालेल्या चोरीच्या घटनेतील चोरटा माहितगार असावा असा अंदाज तपास पथकाने व्यक्त केला आहे. दुकानाची बनावट चावी त्याच्याडे आली कोणाकडून, दुकानातील सिसीटीव्हीची खडा न खडा माहिती चोरटय़ाला असाल्याचे तपासात समोर आले आहे. दुकानाच्या बाहेर असणारे २ कुलुप, तसेच सेंटर लॉक, दुकानातील लॉकरच्या ४ चाव्या अशा एकूण ७ बनावट चाव्या चोरटय़ाने तयार केल्या होत्या.

सिसीटीव्ही, डिव्हीआर पळविला
चोरटय़ाने चोरी करताना दागिन्यांसोबतच दुकानातील सिसीटीव्ही आणी त्याचा डिव्हीआरही लंपास केला. दुकानातील सिसीटीव्ही फुटेजचे कनेक्शन बंद करुनच त्याने दुकानात प्रवेश केला. यामुळे दुकानातील सिसीटीव्ही यंत्रणाही निष्प्रभ ठरली.

परिसरातील सिसीटीव्ही गोळा करण्याचे काम सुरु
चोरटय़ाने दुकानातील सिसीटीव्ही फुटेज व डिव्हीआर नेल्यामुळे पोलिसांनी परिसरातील सिसिटीव्ही फुटेज गोळा करण्याचे काम सुरु केले आहे. सुमारे २० ते २५ दुकानातील फुटेज पोलिसांनी गोळा केले आहे.

…त्या चोरीची आठवण
पाच वर्षापूर्वी सरस्वती टॉकीजजवळील एका चांदीच्या दुकानात बनावट चावीच्या सहाय्याने चोरी करण्यात आली होती. यामध्ये चांदीच्या दागिन्यांवर चोरटय़ांनी डल्ला मारला होता. मात्र यामध्ये नातेवाईकानेच चोरी केल्याचे उघड झाले होते.

Related Stories

Amitabh in high Courtअमिताभ बच्चन यांची हायकोर्टाच धाव; आपल्या प्रतिमेला मागितले संरक्षण

Abhijeet Khandekar

राज्यपाल कोशारी व भाजपवर मंत्री यशोमती ठाकूर यांचा निशाणा

Archana Banage

राजधानी दिल्लीत ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण

Patil_p

सांगली : शिरगाव पुलासाठी 33 कोटीचा निधी मंजूर

Archana Banage

मूर्तीकारांनी सोडून गेलेल्या मूर्तींचे केले विसर्जन

Omkar B

नाचता येईना तर अंगण वाकडे

Tousif Mujawar