61 गाळय़ांचा दुसऱयांदा लिलाव : यावेळी तरी भाडेकरू मिळणार का?
प्रतिनिधी /बेळगाव
महापालिकेच्या व्यापारी संकुलातील गाळय़ांच्या लिलाव प्रक्रियेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. बुधवार दि. 11 रोजी महात्मा फुले भाजीमार्केटमधील 90 गाळय़ांसाठी लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. मात्र यापैकी 61 गाळय़ांचा लिलाव दुसऱयांदा आयोजित करण्यात आला असून यावेळी तरी भाडेकरू मिळणार का? असा मुद्दा उपस्थित झाला आहे.
विविध गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत संपली आहे. महात्मा फुले भाजीमार्केटमधील 29 गाळय़ांच्या भाडेकराराची मुदत मार्चअखेर संपली आहे. तर 61 गाळय़ांची मुदत यापूर्वीच संपली होती. त्यामुळे गतवषी 61 गाळय़ांसाठी पोलीस बंदोबस्तात लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली होती. तर 61 गाळय़ांपैकी 49 गाळय़ांना बोली लावण्यात आली होती. मात्र सदर गाळय़ांचा ताबा आपला असल्याचा दावा करून यापूर्वीच्या भाडेकरूंनी न्यायालयात धाव घेतली होती. तसेच लिलाव प्रक्रिया राबवू नये, अशी मागणी न्यायालयाकडे केली होती. त्यामुळे लिलावावेळी बोली लावूनही बोलीधारकांनी अनामत रक्कत भरणा करून गाळय़ांचा ताबा घेतला नाही. त्यामुळे लिलाव प्रक्रिया बारगळली होती. मात्र सदर गाळय़ांसाठी महापालिकेने पुन्हा लिलाव प्रक्रिया आयोजित केली आहे.
नागरिकांचे लक्ष
महात्मा फुले भाजीमार्केटमधील एकूण 90 गाळय़ांसाठी बुधवार दि. 11 रोजी महापालिका मुख्य कार्यालयात लिलाव प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. यावेळी 61 गाळय़ांसाठी बोली लागणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
गाळय़ांचा तपशील
व्यापारी संकुलाचे नाव | गाळय़ांचा आकार | गाळा क्र. | अनामत रक्कम | भाडे रक्कम |
महात्मा फुले, भाजीमार्केट | 125 चौ. फूट | 1 ते 5 | 42300 | 3200 |
महात्मा फुले, भाजीमार्केट | 90 चौ. फूट | 6 ते 15 व 18 ते 26 | 30500 | 2600 |
महात्मा फुले, भाजीमार्केट | 145 चौ.फूट | 16 व 17 | 49100 | 3500 |
महात्मा फुले, भाजीमार्केट | 145 चौ.फूट | 27 ते 30 | 49100 | 3500 |
महात्मा फुले, भाजीमार्केट | 65 चौ. फूट | 59 व दोन गोडावून | 20600 | 2600 |