गाड्यांची भरपाई मिळेपर्यंत झाड हटवू देणार नसल्याची गाडी मालकांची भूमिका
ओटवणे प्रतिनिधी
माजगाव – चराठे उद्यमनगर मुख्य रस्त्यावर जीर्ण झाड विद्यूत वाहिन्यांनंतर त्या खाली उभ्या दोन दुचाकींवर पडल्याने वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने या घटनेवेळी पाऊस सुरू असल्याने वाहतूक किरकोळ होती. त्यामुळे अनर्थ टाळला. त्यानंतर जो पर्यंत गाड्यांची नुकसान भरपाई मिळत नाही तो पर्यंत गाड्या हटवणार नाही अशी भूमिका वाहन मालकांनी घेतली होती. त्यामुळे घटना घडूनही चार तास हे झाड जैसे थे होते.यावेळी वीज आणि सार्वजानिक बांधकाम खात्याचे अधिकारी तात्काळ घटना स्थळी दखल झाले. अखेर या दोन्हीं वाहन चालकांना भरपाई दिल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने हे झाड मुख्य रस्त्यावरून हटविण्याचे काम सुरू करण्यात आले.दरम्यान ,या धोकादायक जीर्ण झाडाबाबत विज वितरण तसेच सार्वजानिक बांधकाम खात्याचे अनेक वेळा लक्ष वेधण्यात आले होते. परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आल्यानेच हा प्रकार घडला.