प्रतिनिधी /फोंडा
सोनारबाग-उसगाव येथे खांडेपार नदीवर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्याला स्थानिकांनी जोरदार विरोध करीत तेथे सुऊ केलेले बांधकाम बंद पाडले. बंधाऱ्याला विरोध करण्यासाठी मंगळवारी सकाळी मोठ्या संख्येने लोक एकत्र आल्याने वातावरण तंग बनले होते. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी फोंड्याचे मामलेदार तसेच पोलीस निरीक्षक फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल झाले.
या बंधाऱ्यामुळे पावसाळ्यात सोनारबाग भागात पुराचा धोका निर्माण होणार अल्याची भिती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी आलेल्या महापूरात या भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरुन आणीबाणीची स्थीती निर्माण झाली होती असे स्थानिक पंचसदस्य विनोद मास्कारेन्हास यांनी सांगितले. सोनारबाग येथे जलसंवर्धन खात्याने बंधाऱ्याचे काम सुरु केल्यानंतर स्थानिक नागरिक मोठा जमाव करुन एकत्र आले व त्यांनी काम बंद पाडले. कामाच्या ठिकाणी आणलेली यंत्रसामग्रीही परत नेण्याची जोरदार मागणी करण्यात आली.